Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अती बोलण्याने किंमत शून्य झाली!' DP च्या मनात नाराजी! अंकिता, पॅडीचा B ग्रुप सोडायची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 14:11 IST

DP दादाने मनातली नाराजी प्रकट केली असून अंकिता, पॅडीच्या B ग्रुपबद्दल नाराजी प्रकट केली आहे (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये नात्यांची समीकरणं सारखी बदलताना दिसतात. पहिल्या दोन आठवड्यात जान्हवी-निक्की या एकमेकींच्या जिगरी मैत्रिणी आता मात्र एकमेकींच्या शत्रू झाल्या आहेत. तर दुसरीकडे अरबाज-वैभव या चांगल्या मित्रांमध्येही खटके उडताना दिसत आहेत. आता मात्र प्रेक्षकांना धक्का बसेल असा प्रोमो रिलीज झालाय. धनंजय पोवार अर्थात DP दादाने B ग्रुप सोडण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे अंकिता, पॅडीला वाईट वाटलेलं दिसतंय. 

DP दादा B ग्रुप सोडणार?

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये डीपी दादा आणि अंकिता संभाषण करताना दिसत आहेत. डीपी दादा म्हणत आहेत,"अती बोलल्याने किंमत शून्य झाली आहे एवढचं आहे. ग्रुपमध्ये कधी माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही". त्यावर अंकिता डीपी दादा ग्रुप सोडायचाय का विचारते. यावर डीपी दादा होकार देतात. त्यानंतर अंकिता यासंदर्भात पॅडी दादांना सांगताना दिसून येते. पॅडी दादा म्हणतात,"ग्रुपवर अविश्वास दाखवताय तुम्ही. मुळात चुकलंय काय?". त्यावर अंकिता म्हणते,"ते जे फील करतात ते खूप चुकीचं आहे. त्यामुळे सगळे इक्वेशन बदलतील".

'बिग बॉस मराठी'च्या घरात सुरू आहे गुपचूप टास्कची प्लॅनिंग 

'बिग बॉस मराठी'च्या घरात गुपचूप टास्कची प्लॅनिंग सुरू आहे. कोणी प्रॉमिस देतंय तर कोणी नाटक करताना दिसून येत आहे. निक्कीने आणि घन:श्याम आणि अंकिता, वर्षा ताई, अभिजीत टास्क जिंकण्यासाठी गुपचूप जोरदार प्लॅनिंग करताना आजच्या भागात दिसून येणार आहेत. त्यामुळे कोण टास्क जिंकणार आणि कोण हरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच DP दादाने जर ग्रुप सोडला तर तो कोणत्या ग्रुपला जाऊन मिळणार, याकडेही सर्वांचं लक्ष आहे.

 

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीअंकिता प्रभू वालावलकर