Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवा असं रडते का? पूर्वा कौशिकने सांगितला चिमुकल्या चाहत्याचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 15:56 IST

Shiva: शिवाला भेटण्यासाठी एक चिमुकली मुलगीदेखील मालिकेच्या सेटवर आली होती. ही चिमुकली तर थेट पूर्वाला घरी घेऊन जाण्याचा हट्टच धरुन बसली.

छोट्या पडद्यावर सध्या शिवा ही मालिका चांगलीच गाजत आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिक या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. अल्पावधीत ही मालिका लोकप्रिय झाली असून पूर्वा घराघरात लाडकी झाली आहे. अलिकडेच पूर्वाने तिच्या एका चिमुकल्या चाहतीचा किस्सा सांगितला. तिची एक चाहती चक्क तिला भेटण्यासाठी मालिकेच्या सेटवर आली होती. इतकंच नाही तर एका लहान मुलाने चक्क सिनेमा पाहतांना शिवाची आठवण काढली.

एक लहान मुलगा त्याच्या आई-बाबांसोबत सिनेमा पाहत होता. या सिनेमातील अभिनेत्री रडत होती. तिला रडतांना पाहून तो चिमुकला पटकन म्हणाला, की ह्या...शिवा असं रडते का कधी, शिवा नाही रडत मग ही का रडतीये? असा हा चिमुकला म्हणाल्याचं पूर्वाने सांगितलं. यावेळी तिने आणखी एक किस्सा सांगितला.

त्या दिवशी सेटवर शिवाची एक चिमुकली चाहती तिला भेटायला आली. आमच्या मालिकेत सायलेन्सर आहे त्याची लहान बहीण होती ती. हातात फुलं घेऊन ती सकाळी लवकर खास मला भेटण्यासाठी आली.  आणि, त्याच दिवशी नेमका माझा संध्याकाळचा कॉल टाइम होता. ती आतुरतेने माझी वाट पाहत होती. विशेष म्हणजे पॅकअप झाल्यानंतरही ती १ तास माझी वाट पाहत बसली आणि ज्यावेळी तिने मला पाहिलं  त्यावेळी तिच्या डोळ्यातला आनंद पाहण्यासारखा होता. तो क्षण मी कॅमेरात कैद करायचा प्रयत्न केला पण तो माझ्या हृदयावर कोरला गेला आहे.

दरम्यान, शिवाला पाहिल्यावर ही चिमुकली सेटवरुन घरी जायला तयार नव्हती. आपण शिवाला सोबत घेऊन जाऊयात हाच हट्ट तिने धरला होता. अखेर पूर्वाने तिची समजूत घातली आणि मग ती  चिमुकली निघाली.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार