Join us

'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतंय माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 15:30 IST

Aai kuthe kay karte:या मालिकेतील प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा होत असते. यात खासकरुन देशमुखांचा घर हा अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेला आतापर्यंत अपार प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली आहे. एका सर्व सामान्य गृहिणीच्या आयुष्याभोवती फिरणारी ही मालिका पहिल्या दिवसापासून सुपरहिट ठरली. त्यामुळेच या मालिकेविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यात खासकरुन मालिकेतील कलाकारांचं मानधन किती?, कलाकारांची खरी नावं काय?  या सारखे अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच आता या मालिकेचं चित्रीकरण नेमकं कुठे सुरु आहे हे समोर आलं आहे.

तसं पाहायला गेलं तर या मालिकेतील प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा होत असते. यात खासकरुन देशमुखांचा घर हा अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे हे घर नेमकं कुठे आहे, हे खरंच घर आहे की सेट आहे असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.

'अग्गंबाई सासूबाई' वरुन सुचलंय 'आई कुठे काय करते' मालिकेचं नाव?; तुम्हाला माहितीये का हे खास कनेक्शन

साधारणपणे कोणत्याही मालिकेचं किंवा चित्रपटाचं चित्रीकरण करण्यासाठी खास सेट उभारले जातात. परंतु, आई कुठे काय करते या मालिकेतील प्रत्येक गोष्ट खरी वाटावी आणि प्रक्षेकांच्या मनाला भिडावी यासाठी मेकर्सने प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी यावर भर दिला आहे.

दरम्यान, आई कुठे काय करते या मालिकेत जे देशमुखांचं घर दाखवण्यात आलं आहे. तो कोणताही तयार सेट नाही. उलटपक्षी एका खऱ्याखुऱ्या घरामध्येच हे चित्रीकरण सुरु आहे.  'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. सध्या या मालिकेत अनेक नवनवीन रंजक वळण येत असून मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टींग होत आहे. सध्या या मालिकेत देशमुख कुटुंबात अभि आणि अनघाच्या लग्नाची धावपळ असल्याचं पाहायला मिळत आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार