Deepika Singh: 'दीया और बाती हम' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दीपिका सिंह. मालिकेत तिने संध्या राठी ही भूमिका साकारली होती. शिवाय या मालिकेमुळे तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड वाढला. सध्या अभिनेत्रीच्या बाबतीत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. तब्येत बिघडल्यामुळे दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याबाबत सोशल मीडियावर आता अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत हेल्थ अपडेट दिली आहे. ब्लड प्रेशर लो झाल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, असंही तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
अलिकडेच दीपिका सिंहने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. ज्यामध्ये तिच्या हाताला सलाईन लावल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेत आहेत. पण काही वेळानंतर अभिनेत्रीने आणखी एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने आपण आता पूर्णपणे ठणठणीत असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. दरम्यान, दीपिकाने इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, "हॅलो मित्रांनो... मी आता पूर्णपणे बरी आहे. आता मी घरी आले आहे. ब्लड प्रेशर कमी झालं होतं ही गोष्ट खरी आहे. पण, आता मी सेटवर नसून विश्रांती घेत आहे. मला अॅसिडीटीचा त्रास असल्यामुळे डोकेदुखी आणि बीपी कमी झाला होता. त्यामुळे सलाईन लावाली लागली. मात्र, आता मी ठिक आहे. काळजी करण्यासारखं काही कारण नाही. यासाठी मी डॉक्टरांची मनापासून आभारी आहे. त्यांनी योग्य वेळी उपचार केले. शरीरात सोडिअमच्या कमतरतेमुळे ब्लड प्रेशर कमी झालं होतं. अॅसिडीटीमुळे मला उल्टी झाली आणि त्याच्यानंतर हा त्रास सुरु झाला. "
लवकरच कामाला सुरुवात करेन...
या व्हिडीओमध्ये दीपिकाने ती लवकच कामावर परतणार असल्याचं म्हटलं आहे. त्याबद्दल सांगताना ती म्हणते, "आता माझी तब्ब्येत ठिक आहे. उद्यापासून मी कामाला सुरुवात करणार आहे. सेटवर जाऊन पुन्हा शूटिंग करणार आहे, त्यामुळे काळजी करु नका." अशी माहिती अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये दिली आहे.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने 'दीया और बाती हम' मालिकेत तिला मुख्य भूमिकेत झळकली. 2016 पर्यंत मालिका चालली. ५ वर्ष तिने मालिकेत काम केलं. सध्या ती कलर्सवरील 'मंगल लक्ष्मी' मालिकेत काम करत आहे.