Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्यासोबतचे फोटो केले डिलीट, घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवाल म्हणाली; 'माझा पती...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 10:04 IST

दिव्या अग्रवाल लांबलचक पोस्ट लिहित म्हणाली...

'बिग बॉस ओटीटी सिझन 1'ची विजेती दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने अपूर्व पाडगांवकरसोबत लग्नगाठ बांधली. आता अचानक दिव्याने लग्नाचे आणि हनिमूनचे फोटो सोशल मीडियावरुन डिलिट केलेत. शिवाय अपूर्व आणि दिव्याने एकमेकांना अनफॉलो केलं आहे. यावरुन दिव्याच्या घटस्फोटाची चर्चा कालपासून सुरु झाली. आता दिव्याने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दिव्या अग्रवालने इन्स्टाग्राम स्टोरीवर लांबलचक पोस्ट लिहिली. तिच्या वैयक्तिक आयुष्यावरील चर्चांवर ती लिहिते, "मी काहीच बोलले नव्हते. मी कुठेच कमेंट किंवा स्टोरी पोस्ट केली नव्हती. मी इन्स्टाग्रामवरुन सुमारे २५०० पोस्ट डिलीट केल्या. तरी माध्यमांनी फक्त लग्नाचे फोटो डिलीट केल्याचा एवढा इश्यू केला. लोक गोष्टींकडे कसं पाहतात हे फारच मजेशीर आहे आणि माझ्याकडून त्यांना काय अपेक्षित आहे. मी नेहमीच असं काही केलं आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आता हे लोक काय अपेक्षा करत आहेत मूल नाहीतर डिव्होर्स...यापेकी काहीच होत नाहीए."

ती पुढे लिहिते, "वास्तविक पाहता माझ्या इन्स्टाग्रामवर पहिल्या पिन असलेल्या पोस्टवर आता यापुढे बोलावं. प्रत्येक सिनेमाचा शेवट सुखद होतो आणि देवाच्या कृपेने माझा पती बाजूला आरामात घोरत झोपला आहे."

दिव्या आणि अपूर्व यांची लव्हस्टोरी सांगायची तर ब्रेकअपनंतर ते पुन्हा एकत्र आले होते. 2015 साली दोघं एकमेकांना डेट करत होते. नंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. दिव्याने प्रियांक शर्मा आणि वरुण सूद यांना डेट केलं. मात्र जुनं प्रेम त्यांच्या आयुष्यात परत आलं. दिव्याने वरुण सोबत ब्रेकअप करत 2022 मध्ये अपूर्वसोबत पुन्हा पॅचअप केलं. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीघटस्फोटसोशल मीडियाव्हायरल फोटोज्