Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लोक या पद्धतीने...'; मुलीच्या पांढऱ्या केसांवरुन ट्रोल करणाऱ्यांना जेठालालने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 19:45 IST

Dilip joshi: लग्नात तिने केसांना कोणताही कलर न लावता आहे त्याच केसांमध्ये सगळ्यांसमोर आली.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून जवळपास १२-१३ वर्ष प्रेक्षकांचं अवितरतपणे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे दिलीप जोशी. या मालिकेत त्यांनी जेठालाल ही भूमिका साकारली आहे. अलिकडेच दिलीप जोशी यांच्या लेकीचं नियती जोशीचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं. हा लग्नसोहळा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला. अनेकांनी दिलीप जोशी यांच्या लेकीचं कौतुक केलं. तर काहींनी तिला ट्रोलही केलं. नियतीचे केस पांढरे असल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. परंतु, या ट्रोलर्सला आता दिलीप जोशींनी उत्तर दिलं आहे. 

दिलीप जोशी यांच्या लेकीचे नियतीचे केस पांढरे झाले आहेत.विशेष म्हणजे लग्नात तिने केसांना कोणताही कलर न लावता आहे त्याच केसांमध्ये सगळ्यांसमोर आली. आपण जसे आहोत तसं स्वत: ला स्वीकारलं पाहिजे असं तिचं मत होतं. मात्र, तरीदेखील अनेकांनी तिला ट्रोल केलं. यामध्येच आता दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

"लग्नाच्या दिवशी पांढऱ्या केसांमध्येच सगळ्यांसमोर तिने घेतलेल्या निर्णयावर  आमचा कोणाचाच आक्षेप नव्हता. लोक या पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया देतील याची कल्पनाही आम्ही कधी केली नव्हती.आमच्या घरात सुद्धा याविषयी काहीच चर्चा झाली नव्हती. ती जशी आहे तशी छान आहे. सगळ्यांनी तिच्या या निवडीकडे सकारात्मकतेने पाहिलं आणि मला आनंद आहे की तिच्या या निर्णयामुळे इतरांनाही प्रेरणा मिळाली असेल.  आपण जसे आहोत तसंच राहिलं पाहिजे आणि जगासमोरही तसंच आले पाहिजे", असं दिलीप जोशी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "सुरुवातीला प्रत्येकाने तिच्याविषयी चर्चा करायला सुरुवात केली. पण, तिला लो प्रोफाइलच राहायला आवडतं. मात्र, सोशल मीडिया अशी गोष्ट आहे ज्यावर आपण नियंत्रण नाही मिळवू शकत. यात चांगली गोष्ट एकच घडली ती म्हणजे तिच्यामुळे अनेक लोकही प्रेरित होतील."

दरम्यान, दिलीप जोशी यांच्या लेकीने लिरिसिस्ट अशोक मिश्रा यांचा मुलगा यशोवर्धन मिश्रा याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार