Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांका त्रिपाठीचे हे फोटोज पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 07:00 IST

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपल्या सौंदर्याची जादू दाखवत आहे. तिच्या या फोटोला खूप सारी पसंती मिळत आहे.

'ये है मोहब्बते' मालिकेत दिव्यांका इशिताची भूमिकेत झळकत आहे. या भूमिकेतून ती लोकप्रिय झाली आहे. शिवाय तिला चाहत्यांचे भरभरून प्रेमही मिळाले आहे. दिव्यांकाने  दमदार अभिनयासह आपल्या मादक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने रसिकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही रसिकांशी संवाद साधत असते.  इथे ती आपले नवनवे फोटो फॅन्ससह शेअरही करते. नुकतंच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोतील तिचा ग्लॅमरस लूक कुणालाही क्लीन बोल्ड करेल. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपल्या सौंदर्याची जादू दाखवत आहे. तिच्या या फोटोला खूप सारी पसंती मिळत आहे. या फोटोत दिव्यांकाने निळ्या रंगाचा गाऊन परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर दिव्यांका  प्रचंड लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.

टीव्ही कपलमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे सगळ्यांचे फेव्हरेट असून आणि रोमँटीक कपल आहे. त्यांच्या विषयी छोट्यातली छोटी गोष्टी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. या दोघांचा एक रोमँटीक फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून लव इज द एअर असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. नुकतेच हे दोघे मालदीवला व्हॅकेशनसाठी गेले होते. दोघांनी  एकत्र वेळ घालवत  सुट्ट्यांचा मस्त आनंद लुटला. याच स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहे. हा फोटो शेअर होताच तिच्या या फोटोला अनेक लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत.नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढत विवेक पत्नी दिव्यांकासह हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय. 

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीये है मोहब्बतेंविवेक दहिया