Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर'च्या 'त्या' 'ट्रेंड'वर रील्स बनवणाऱ्यांना अंकितानं चांगलंच खडसावलं, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:14 IST

'कोकण हार्टेड गर्ल'चा पारा चढला! 'धुरंधर'च्या स्पाय ट्रेंडवरून अंकिताने रील्स बनवणाऱ्यांना झापलं!

Ankita Walawalkar On Day 1 As Spy Trend Dhurandhar Movie : गेल्या ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेला 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ निर्माण झाली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटातील रणवीर सिंग , आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि अक्षय खन्ना यांच्या कामाचं प्रेक्षकही कौतुक करीत आहेत. सोशल मीडियावरही सर्वत्र 'धुरंधरचीच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर 'Day 1 As a Spy' हा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र, 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरला हा ट्रेंड अजिबात आवडलेला नाही. देशासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या गुप्तहेरांची अशा प्रकारे थट्टा उडवणाऱ्या इन्फ्लूएन्सर्सना अंकिताने चांगलेच झापले आहे.

अंकिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, Spy वर मस्करी करून reel बनवणं म्हणजे विनोद नाही तर अज्ञान आहे. त्यांचं आयुष्य कंटेंट नाही, तो दररोजचा धोका आहे. थोड्या views साठी देशासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्यांची थट्टा करणं हे IQ नाही, हे संवेदनशून्यपणाचं प्रदर्शन आहे. Spy बनायला फक्त attitude नाही तर...मेंदू,धैर्य आणि त्याग लागतो. तुमच्या reels मुळे चित्रपट promote होतील, पण त्यामागे असलेली देशसेवा, देशासाठी जगणाऱ्यांची किंमत कमी होतेय हे लक्षात ठेवा. एकदा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघा. नाव विसरावं लागतं, कुटुंब विसरावं लागतं, आणि तरीही देश पहिला. Views मिळतील तुम्हाला पण लाज उरायला हवी", या शब्दात तिनं सुनावलं. 

या व्हिडीओमध्ये अंकिता वालावलकर म्हणते की, 'Day 1 As Spy In Pakistan कसला भन्नाट ट्रेंड चालू झालाय ना हा. म्हणजे सगळे क्रिएटर ह्यावर रील्स बनवतायत. एवढं सोपं वाटतंय का? स्पायचं काम? त्यावर आपण रील्स बनवू शकतो आणि जोक पास करू शकतो. स्पाय बनणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. एका वेगळ्या देशात, वेगळ्या ओळखीने ते राहत असतात. तिथून ते देशसेवाच करत असतात. सतत त्या तणावाखाली असताना आपली देशसेवा करणं सोपं नाहीये. कुटुंबापासून लांब राहून, आपला जीव एखाद्या चुकीमुळे जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर, जशी आर्मी आपल्याला प्रिय आहे, तसे हे स्पायसुद्धा देशसेवा करत असतात".

पुढे ती म्हणाली, "आता जेवढे क्रिएटर यावर रील बनवतायत ते २६ जानेवारी, १५ ऑगस्टलाही देशसेवेवर रील्स बनवतील. पण, तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की, ते लोक काय करतायत. थोडंसं वाचन करा. आताचं जग हे फेम आणि क्रेडिटवर चालतं. पण, हे स्पाय आहेत त्यांना फेम आणि क्रेडिट मिळत नाही. त्यांचं नाव कुठे येत नाही. या सगळ्याचा विचार करा. आलाय आपला ट्रेंड म्हणून बनवायच्या रील हे थांबवा.' असं अंकिताने व्हिडीओच्या शेवटी म्हटलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Ankita slams reel creators mocking 'Dhurandhar' spy trend.

Web Summary : Ankita Walawalkar criticized influencers creating reels mocking spies based on the movie 'Dhurandhar'. She emphasized the sacrifices spies make for the country and urged creators to be sensitive, highlighting that their service deserves respect, not mockery for views.
टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरधुरंधर सिनेमा