Tv Celebrity: मालिकाविश्वात काम करणाऱ्या कलाकारांचा चाहतावर्ग फार मोठा असतो. दैनंदिन मालिकामधील कलाकार अगदी अल्पावधीतच घराघरात लोकप्रिय होतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास चाहत्यांना उत्सुकता असते. अशातच नुकतीच एका लोकप्रिय अभिनेत्रीने प्रेक्षकांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत. लोकप्रिय मालिकेत काम केलेल्या या अभिनेत्रीच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने ही आनंदवार्ता सगळ्यांना दिली आहे. या अभिनेत्रीचं नाव सोनारिका भदोरिया आहे.
‘देवों के देव महादेव’ या टीव्ही मालिकेतून अभिनेत्री सोनारिका भदोरिया लोकप्रिय झाली. या टीव्ही मालिकेच्या माध्यमातून तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दरम्यान, सोनारिकाने १८ फेब्रुवारी २०२४ रोजी बॉयफ्रेंड विकास पराशरशी लग्न करत संसार थाटला. तिच्या शाहीविवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. १० वर्षे डेटिंग केल्यानंतर तिने बिझनेसमन बॉयफ्रेंड विकास पाराशरसोबत लग्नगाठ बांधली. नुकतीच सोशल मीडियावर अभिनेत्रीने खास पोस्ट लिहून शेअर केली आहे.लग्नाच्या वर्षभरात या जोडप्याच्या आयुष्यात नव्या सदस्याचं आगमन होणार आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी मंडळी तसेच चाहत्यांकडून सोनारिका आणि विकास यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सोनारिकाने सोशल मीडियावर तिच्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. पांढरा गाऊन परिधान करुन या कपलने हटके पोज देत फोटो क्लिक केले आहेत.
वर्कफ्रंट
सोनारिकाने 'तुम देना साथ मेरा' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. 'देवों के देव महादेव' या मालिकेत पार्वती मातेची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. याशिवाय अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'पृथ्वी वल्लभ-इतिहास भी रहस्य भी', 'दास्तान ए मोहब्बत सलीम अनारकली', 'इश्क में मरजावा' या मालिकांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका गाजल्या. त्यानंतर तिने तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे.