Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महादेव' फेम मोहित रैनाने डिलीट केला लग्नाचा अल्बम, पत्नी अदितीसोबतच्या नात्यात आला दुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 16:51 IST

मोहित रैनाने याच वर्षी ग्लॅमर जगतापासून दूर असलेल्या आदिती शर्मासोबत गुपचूप लग्न केलं होतं.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मोहित रैना छोट्या पडद्यावरील लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मोहित रैना (Mohit Raina)च्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही सुरळीत नसल्याच्या बातम्यांना सोशल मीडियावर चर्चा आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याने लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले आहेत.  

मोहितनं याच वर्षी बांधली होती लग्नगाठमोहित रैनाने 1 जानेवारी 2022 रोजी ग्लॅमर जगतापासून दूर असलेल्या आदिती शर्मासोबत गुपचूप लग्न केले. मोहित रैना आणि आदिती यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग ते डेट करू लागले. या कपलनं जानेवारीमध्ये लग्न केले आणि अभिनेत्याने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करून याची घोषणा केली होती.

मोहित रैनाने डिलीट केलं लग्नाचे फोटो मोहितने त्याचे लव्ह लाईफ प्रायव्हेट ठेवले असले तरी त्याचे लग्नाचे फोटो डिलीट करणे लोकांना पचनी पडत नाही. एवढेच नाही तर दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाहीत. त्यामुळे कपलच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या वृत्तांवर अभिनेत्याने कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

मोहित रैना देवों के देव महादेव या मालिकेत भगवान शिवशंकर यांची भूमिका निभावली होती. तसेच, उरी चित्रपटात विकी कौशलसोबतही मोहितने काम केलं आहे. मात्र, मोहितच्या देवों के देव महादेव मालिकेतील भूमिकेचं सर्वत्र कौतूक झालं होतं.

 

टॅग्स :टिव्ही कलाकारलग्न