Join us

प्रेग्नंसीनंतर टीव्हीवर कमबॅक करणार गोपी बहू? देवोलिना भट्टाचार्जी म्हणाली- "माझं बाळ..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 11:48 IST

प्रेग्नंसीमुळे देवोलिनाने कामातून ब्रेक घेतला होता. आता पुन्हा तिला टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याबाबत देवोलिनाने अपडेट दिली आहे.

'साथ निभाना साथिया' मालिकेत छोटी बहूचं पात्र साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी देवोलिना भट्टाचार्जी नुकतीच आई झाली आहे. देवोलिनाने डिसेंबर महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. लेकाचं नाव तिने जॉय असं ठेवलं आहे. प्रेग्नंसीमुळे देवोलिनाने कामातून ब्रेक घेतला होता. आता पुन्हा तिला टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याबाबत देवोलिनाने अपडेट दिली आहे.

देवोलिना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये एका चाहत्याने देवोलिनाला "टेलिव्हिजनवर कमबॅक कधी करणार?" असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नावर देवोलिनाने उत्तर दिलं. ती म्हणाली, "सध्या तरी वेळ आहे...जॉय थोडा मोठा झाल्यानंतरच मी कमबॅख करेन". त्यामुळे गोपी बहूला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

दरम्यान, देवोलिनाने २०२२ साली शाहनवाज शेखसोबत लग्न केलं होतं . आंतरधर्मीय विवाह केल्याने देवोलिनाला ट्रोलही करण्यात आलं होतं. देवोलिनाचा पती शाहनवाज हा एक जीम ट्रेनर आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी देवोलिना आणि शाहनवाज आईबाबा झाले. देवोलिनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, 'साथ निभाना साथिया'मुळे तिला लोकप्रियता मिळाली. 'लाल इश्क', 'छटी मैया की बिटिया' या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'बिग बॉस', 'डान्स इंडिया डान्स' या रिएलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. 

टॅग्स :देवोलिना भट्टाचार्जीटिव्ही कलाकार