टीव्हीवर 'गोपी बहू' म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) चर्चेत आली आहे. ९ महिन्यांपूर्वी देवोलिनाने मुलाला जन्म दिला. तर आता ती पुन्हा प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. आजपासून नवरात्रोत्सवाला आरंभ झाला आहे. घटस्थापनेच्या दिवशी देवोलिनाने सुंदर साडी नेसून हातात दिवा घेऊन फोटो शेअर केले आहेत. यात तिने पोटावर हात ठेवला असून बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. यावरुनच देवोलीना दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
देवोलिनाने भट्टाचार्जीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. यात तिने बंगाली लूक केला आहे. बंगाली स्टाईल साडी, कपाळावर लाल कुंकू, मोकळे केस , सोन्याचे दागिने परिधान केले आहेत. तिच्या हातात दिवा आहे आणि त्याकडे बघत तिने पोज दिली आहे. तर तिचा दुसरा हात तिने पोटावर ठेवला आहे. यात तिचा बेबी बंप दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले,"माता दुर्गाचं धरतीवर आगमन झालं आहे. हे महालय सर्वांच्या आयुष्यात शक्ती, सकारात्मकता आणि आनंद घेऊन येवो. प्रेम आणि सद्भावनेने या सणाची सुरुवात करुया. शुभ महालया!"
बेबी बंप पाहून देवोलिनाचं हे प्रेग्नंसी फोटोशूटच वाटत आहे. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत देवोलिना पुन्हा प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न विचारला आहे. आता देवोलिना खरंच प्रेग्नंट आहे की हे मागच्या वर्षीचं फोटोशूट आहे या संभ्रमात चाहते पडले आहेत. तर काही चाहत्यांनी देवोलिनाला ट्रोलही केलं आहे. आसामी गायक जुबीन गर्गचं निधन झालं असताना देवोलिना फोटोशूट करत असल्याची टीका करत आहेत.