Join us

देबीना बॅनर्जी दुसऱ्यांदा होणार आई; ४ महिन्यांपूर्वीच दिलाय गोंडस मुलीला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 13:42 IST

Debina bonnerjee: ४ महिन्यांपूर्वी देबीनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर आता ती पुन्हा दुसऱ्यांदा आई होणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देबीना बॅनर्जी (debina bonnerjee) लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. ४ महिन्यांपूर्वी देबीनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर आता ती पुन्हा दुसऱ्यांदा आई होणार आहे. ही गोड बातमी देबीना आणि गुरमीत यांनी सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

देबीनाने इन्स्टाग्रामवर एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत नवरा गुरमीत आणि ४ महिन्यांची लेक लियानादेखील दिसून येत आहे. सोबतच देबीनाच्या हातात सोनोग्राफीचा फोटो असून आमच्या तिघांमध्ये चौथा पाहुणा येतोय असं तिने म्हटलं आहे.

"काही निर्णय हे भाग्य ठरवत असतं. हे भाग्य कोणीही बदलू शकत नाही. हा तोच एक आशीर्वाद आहे. लवकरच आमचं कुटुंब पूर्ण करायला तो/ती येत आहे", असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे.

देबीनाची ही पोस्ट पाहिल्यावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. युविका चौधरी, रश्मी देसाई, माही विज, टीना दत्ता या कलाकारांनी तिचं अभिनंदन केलं आहे.दरम्यान, देबीना लग्नानंतर जवळपास ५ वर्ष बाळासाठी प्रयत्न करत होती. मात्र, काही अडचणी येत होत्या. देबीनाने २ IVFs  आणि ३ IUIs ट्रिटमेंट केल्या होत्या. परंतु, त्या फेल गेल्या. तसंच काही थेरपीदेखील तिने केल्या होत्या. अखेर ३ एप्रिल रोजी तिने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला.

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन