Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझा देव चोरला आज..."; अजित पवारांच्या निधनामुळे सूरज चव्हाण भावुक; दादांनी बांधून दिलं होतं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:17 IST

Suraj Chavan Emotional Post: अजित दादांनी ज्याला घर बांधून देण्याचा शब्द दिला. आणि तो पाळला अशा सूरज चव्हाणने दादांसाठी डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट लिहिली आहे.

आज अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी त्यांची कारकीर्द चांगलीच गाजवली होती. लोकांचं काम करणारा नेता, म्हणून अजित पवारांची ओळख होती. अशातच अजित पवारांनी ज्याला घर बांधून दिलं अशा सूरज चव्हाणने दादांसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे.अजित पवारांसोबतचा फोटो पोस्ट करुन सूरजने लिहिलंय की, ''मित्रांनो माझा देव चोरला आज... मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं… अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय… माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन... दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली... तुमचाच सूरज...''सूरज चव्हाणची दादांसाठी भावुक पोस्ट

सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचा शब्द अजित पवारांनी दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला आणि सूरज चव्हाणला टुमदार घर बांधून दिलं. आज सकाळच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्र या दुःखद बातमीमुळे शोकाकुल झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's death: Suraj Chavan emotional; Pawar built his home.

Web Summary : Following Ajit Pawar's tragic death in a plane crash, Maharashtra mourns. Suraj Chavan, whose house Pawar helped build, shared a heartfelt tribute, expressing immense gratitude for Pawar's kindness and support in providing him with a new life.
टॅग्स :अजित पवारविमान दुर्घटनाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार