Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भाऊ, बाईकवरुन पाय पुरतात का?', चाहत्याच्या भन्नाट कमेंटवर दत्तू मोरेने दिलं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 18:11 IST

दत्तूला बायकोने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त बाईक गिफ्ट केली.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेला (Dattu More) त्याच्या बायकोने नुकतंच खास गिफ्ट दिलं. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने त्याची बायको डॉ स्वाती घुगाणेने नवऱ्याला बजाजची बाईक गिफ्ट दिली. दत्तूने व्हिडिओ शेअर करत बायकोचे आभार मानलेत. दरम्यान एका चाहत्याने दत्तूला गंमतीशीर प्रश्न विचारला यावर दत्तूचं उत्तर चर्चेत आहे.

दत्तू मोरे सोशल मीडियावर सक्रिय असतो. तसंच त्याच्या अभिनयाचे आणि साध्या स्वभावाचे प्रेक्षक चाहते आहेत. बाईक घेतल्याचा आनंदही त्याने सोशल मीडियावर शेअर केला. कलाकरांनी आणि चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं. 'लवकरच दोनाचे चार होवो, मी गाडीबद्दल बोलतोय भलतंच समजू नका' अशी मजेशीर कमेंट एकाने केली आहे. यावर दत्तूही हसला आहे. तर आणखी एका चाहत्याने विचारले, 'भाऊ राग येऊ देऊ नका पण तुमचे पाय पुरतात का त्या गाडीवरुन...अभिनंदन.' चाहत्याच्या या कमेंटवर दत्तूने हसतच लिहिले, 'हो..म्हणूनच घेतली ही गाडी'. 

दत्तू आणि चाहत्यांमधला हा संवाद पाहून नेटकरीही हसलेत. दत्तूची पत्नी स्वाती ही पेशाने डॉक्टर आहे. ती स्त्री रोग आणि प्रसुतीतज्ञ आहे. काही दिवसांपूर्वीच स्वातीने तिचं स्वत:चं क्लिनिक सुरू केलं आहे. ठाण्यात स्वातीचं घुनागे क्लिनिक व सोनोग्राफी सेंटर आहे. दत्तू अनेकदा पत्नीबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतो.

टॅग्स :मराठी अभिनेतामहाराष्ट्राची हास्य जत्रासेलिब्रिटीसोशल मीडियाट्रोल