आपल्या मिश्किल शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून झाकीर कामातून मोठा ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्यामागे त्याची बिघडलेली तब्येत असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता स्वतः झाकीर खानने या चर्चांवर मौन सोडले असून ब्रेक घेण्याचे खरे कारण स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर सध्या झाकीरचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान झाकीरला त्याच्या ब्रेकबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, "आरोग्य थोडं बिघडलं आहे, पण ते इतकंही गंभीर नाही जेवढं इंटरनेटवर सांगितलं जातंय. मी स्टेजवर येऊच शकणार नाही किंवा माझी प्रकृती खूप चिंताजनक आहे, या सर्व अफवा आहेत. माझे कुटुंब माझ्यासोबतच राहते आणि अशा बातम्या वाचून आम्ही स्वतःच थक्क होतो की, हे नक्की कुणी कन्फर्म केलंय?"
झाकीरने स्पष्ट केले की, आरोग्यापेक्षाही लेखनासाठी वेळ देणे हे त्याच्या ब्रेकमागचे मुख्य कारण आहे. तो म्हणाला, "खरे कारण हे आहे की, माझ्याकडे लेखनासाठी बरेच काम आले आहे. गेल्या सहा वर्षांपासून व्यस्त वेळापत्रकामुळे मला लिखाणासाठी वेळ मिळत नव्हता. तो वेळ आता मला हवा आहे."
गेल्या महिन्यात हैदराबादमधील 'पापा यार टूर' दरम्यान झाकीरने २०२७-२८ किंवा २०३० पर्यंत लांबचा ब्रेक घेण्याचे संकेत दिले होते. सततचा प्रवास आणि कामाचा ताण यामुळे शरीर थकल्याची कबुली त्याने दिली होती. म्हणून त्याने आतापासूनच आरोग्याला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. या खुलाशानंतर झाकीरच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जरी तो काही काळ स्टेजपासून दूर राहणार असला, तरी तो एका नव्या जोमाने आणि नव्या कथांसह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Comedian Zakir Khan clarifies his break is primarily for writing, not serious health issues as rumored. He aims to dedicate time to writing projects after a busy six years, dismissing alarming health speculations. He hinted at a long break due to travel fatigue.
Web Summary : कॉमेडियन ज़ाकिर खान ने स्पष्ट किया कि उनका ब्रेक मुख्य रूप से लेखन के लिए है, न कि गंभीर स्वास्थ्य समस्याओं के लिए, जैसा कि अफवाह थी। उनका लक्ष्य व्यस्त छह वर्षों के बाद लेखन परियोजनाओं के लिए समय समर्पित करना है, और उन्होंने स्वास्थ्य संबंधी अटकलों को खारिज कर दिया। उन्होंने यात्रा की थकान के कारण लंबे ब्रेक का संकेत दिया।