Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंविरोधात बोलण्यासाठी सुपारी मिळाली? कुणाल कामरा म्हणाला, "माझं बँक अकाऊंट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:54 IST

पोलिसांच्या चौकशीत कुणाल कामरा काय म्हणाला?

कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) नुकत्याच झालेल्या स्टँडअप शोमध्ये उमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विडंबन करणारं गीत सादर केलं. 'भोली सी सूरत' या लोकप्रिय गाण्याच्या चालीवर त्याने एकनाथ शिंदेंवर टिप्पणी केली. यानंतर शिंदे समर्थकांनी तो स्टुडिओच फोडला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कामरावर टीका करत असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. कुणाल कामरला शिंदेंविरोधात बोलण्यासाठी सुपारी मिळाली होती का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो काय म्हणाला वाचा.

कॉमेडियन कुणाल कामरावर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं. तुला सुपारी मिळालेली का? या प्रश्नावर तो म्हणाला, "मी का सुपारी घेऊ? तुम्ही माझं बँक अकाऊंट तपासू शकता. मी मराठीत नाही तर हिंदीत शो केला आहे. मी कोणाकडूनही सुपारी घेतलेली नाही आणि मला कोणी पैसे दिलेही नाहीत."

"कुणाल कामराला माफी मागण्याची गरज नाही, आमचं त्याला समर्थन’’, ठाकरे गटाने घेतली स्पष्ट भूमिका

माफी न मागण्यावर ठाम

कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माफी मागावी अशी मागणी समर्थक करत आहे. मात्र कुणाल माफी न मागण्यावर ठाम आहे. तो पोलिसांना म्हणाला, "मी पूर्णत: शुद्धीत जागसूदपणे हे विधान केलं आहे. मला कोणताच पश्चाताप नाही आणि ना खेद आहे. अशाच प्रकारचं वक्तव्य अजित पवारांनीही शिंदेंवर केलं होतं. त्यामुळे मी तरी का माफी मागू? न्यायालयाने सांगितलं तरच मी माफी मागेल. पोलिस आणि न्यायालयाला सहकार्य करण्याची माझी तयारी आहे. "

टॅग्स :कुणाल कामराएकनाथ शिंदेमहाराष्ट्रमुंबई पोलीस