Join us

Video: कॉमेडीयन किकू शारदा पहिल्यांदाच रागावताना दिसला; आदित्य नारायणसोबत झालं मोठं भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:54 IST

लोकांना हसवणाऱ्या कॉमेडीयन किकू शारदाला पहिल्यांदाच रिअॅलिटी शोमध्ये तावातावात भांडताना बघून प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे

 अभिनेता किकू शारदा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. किकूला आपण 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा'शोमधून लोकांना खळखळून हसवताना पाहिलंय. पण आता किकूला पहिल्यांदाच लोकांनी रागावताना आणि तावातावाने भांडताना पाहिलंय. किकू सध्या 'राईज अँड फॉल' (Rise and Fall) या शोमध्ये आहे. या रिअ‍ॅलिटी शोचा एक प्रोमो नुकताच रिलीज झाला असून, यामध्ये किकू आणि गायक आदित्य नारायणमध्ये मोठा वाद झालेला दिसतोय.किकू आणि आदित्यमध्ये मोठं भांडण

 'राईज अँड फॉल' शोच्या प्रोमोमध्ये दिसतं की, कॉमेडीयन कीकू शारदा आणि गायक आदित्य नारायण यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झालेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये, कीकू आणि आदित्य दोघेही हसताना दिसतात, पण थोड्याच वेळात 'तू कोण आहेस?' असं आदित्य किकूला म्हणतो, आणि त्यांच्यात यावरून जोरदार वाद सुरू होतो. आदित्य नारायण, कीकूला ''माझ्याशी नाट बोल'' असं बोलताना दिसतो. पुढे किकू मोठ्याने हसतो, ओरडतो आणि आदित्यला चिडवताना दिसतो. त्यामुळे दोघांचा वाद टोकाला जातो.

या वादविवादादरम्यान त्यांच्यामध्ये बसलेली कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्या शांत प्रतिक्रियेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कीकू आणि आदित्य हसण्याचा प्रयत्न करत असतानाही धनश्री कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत बसलेली दिसते. तर, त्यांच्याजवळ बसलेल्या इतर स्पर्धकांना मात्र काहीसा धक्का बसतो. हा नवा प्रोमो रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल झाला आहे. 'राईज अँड फॉल' या शोच्या अनोख्या संकल्पनेमुळे प्रेक्षकांना हा शो चांगलाच आवडत आहे.

टॅग्स :किकू शारदाआदित्य नारायणबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार