Join us

'मॅडनेस मचाएंगे'मध्ये खिल्ली उडवल्याने करण जोहर भडकला, अखेर कॉमेडियनने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 15:03 IST

करणने आज सोशल मीडियावर खंत व्यक्त केली. ट्रोलर्स नाही पण जेव्हा आपल्याच इंडस्ट्रीतील लोक अशा प्रकारे ट्रोल करतात तेव्हा दु:ख होतं असं त्याने लिहिलं. अखेर केतन सिंहने आता जाहीररित्या करण जोहरची माफी मागितली आहे.

बॉलिवूड निर्माता करण जोहरची (Karan Johar) नक्कल करणं कॉमेडिअन केतन सिंहला (Kettan Singh)चांगलंच महागात पडलं. सोनी टीव्हीवरील 'मॅडनेस मचाएंगे' शोमध्ये एका स्किटमध्ये केतन सिंहने करण जोहरची नक्कल केली. मात्र ते फारच अभद्र आणि विचित्र वाटत होतं. करणने आज सोशल मीडियावर खंत व्यक्त केली. ट्रोलर्स नाही पण जेव्हा आपल्याच इंडस्ट्रीतील लोक अशा प्रकारे ट्रोल करतात तेव्हा दु:ख होतं असं त्याने लिहिलं. अखेर केतन सिंहने आता जाहीररित्या करण जोहरची माफी मागितली आहे.

केतन सिंह टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, " माझा उद्देश कधीच कोणालाच ठेच पोहोचवायचा नव्हता. मी करण सरांची माफी मागतो. मी जो अभिनय करतो याचं कारण म्हणजे मी कॉफी विद करण शो बऱ्याचदा बघतो. मी त्यांच्या कामाचा चाहता आहे. त्यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा नुकताच आलेला सिनेमा मी ५-६ वेळा बघितला. मला त्यांचा शो आवडतो. त्यांना दुखवायचा माझा मुळीच हेतू नव्हता. मी केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत होतो. दरम्यान जर मी मर्यादा सोडून वागलो असेल तर मी माफी मागतो."

तो पुढे म्हणाला , "करण जोहर यांनी पूर्ण एपिसोड बघितला नाही. फक्त प्रोमो पाहिला. एपिसोड पाहिल्यानंतर मला लोकांची आणि करण सरांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. मला तुमचा अपमान करायचा नव्हता. बरेच कलाकार करण सरांची नक्कल करत नाहीत. मी काही वर्षांपूर्वी कपिल शर्मा शोमध्ये करायचो. त्यानंतर मॅडनेस मचाएंगेमध्ये मी पहिल्यांदा हे केलं. आता मी केवळ माफीच मागू शकतो."

टॅग्स :करण जोहरट्रोलसोशल मीडिया