सध्या भारतात महाकुंभमेळ्याला (mahakumbhmela) हजेरी लावण्यासाठी जगभरातील भाविक आणि सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. काही दिवसांपूर्वी महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अनेकांना धक्का बसला. या प्रकरणावर विविध स्तरांमधून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच अभिनेत्री आणि कॉमेडियन भारती सिंगने (bharti singh) मीडियाने महाकुंभमेळ्याला जाणार का? विचारताच केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
भारती सिंग महाकुंभमेळ्याविषयी काय म्हणाली?
भारती सिंगला महाकुंभमेळ्याविषयी पापराझींनी प्रश्न विचारला की, भारतीजी तुम्ही महाकुंभला जाणार आहात की नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना भारती म्हणाली की, "बेशुद्ध होऊन तिथे माझं काही बरंवाईट झालं तर..! माझी इच्छा होती तिथे जायची पण प्रत्येक दिवशी तिकडच्या अशा बातम्या कानावर येत आहेत त्यामुळे म्हटलं राहूहे. माझ्या मुलाला घेऊन तिथे जाणं बरोबर नाही." अशाप्रकारे भारती सिंगने तिचं मत व्यक्त केलं.
भारती पुढे असंही म्हणाली की, तिचा पांडे नावाच्या बॉडीगार्ड मूळचा प्रयागराजचा आहे. याशिवाय संगमापासून त्याचं घर फक्त ४ किलोमीटर अंतरावर आहे. भारती सिंगने दिलेल्या उत्तराचं अनेकांनी समर्थन केलं असून अनेकांनी नाराजीही व्यक्त केलीय. भारती सिंग सध्या 'लाफ्टर शेफ्स सीझन २'चं सूत्रसंचालन करत आहे. भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया या कपल्सची चांगलीच चर्चा आहे. या दोघांना एक मुलगा असून ते लेकाला प्रेमाने 'गोला' असं म्हणतात.