Join us

अंतर्गत राजकारणामुळे CID मालिका झाली बंद?; दयानंद शेट्टीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 08:44 IST

Dayanand shetty: जवळपास २१ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मात्र, अचानकपणे ती बंद करायचा निर्णय घेण्यात आला.

९० चा काळ गाजवणारी लोकप्रिय मालिका म्हणजे CID. जवळपास १५०० एपिसोड करणाऱ्या या मालिकेने २०१८ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका १९९८ मध्ये पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तेव्हापासून जवळपास २१ वर्ष तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. परंतु, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ही मालिका २०१८ मध्ये अचानकपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मालिका बंद झाल्यावर अभिनेता दयानंद शेट्टी (Dayanand shetty) याने मालिका ऑफएअर जाण्यामागचं कारण सांगितलं आहे.

अलिकडेच मालिकेतील दयाने म्हणजेच अभिनेता दयानंद शेट्टी याने युट्यूबर लक्ष महेश्वरीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मालिका बंद होण्याविषयी एक मोठा खुलासा केला. अंतर्गत राजकारणामुळे ही मालिका बंद करावी लागली, असा मोठा खुलासा त्याने यावेळी केला.

सीआयडी’ या मालिकेत दयानंद शेट्टी, शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, अलाना सय्यद, अजय नागरथ, दिनेश फडणीस, तान्या अब्रॉल यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. युट्यूबर लक्ष महेश्वरीला दिलेल्या मुलाखतीत दयानंदने मालिका संपण्यामागचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. अंतर्गत राजकारणामुळे ही मालिका बंद करण्यात आली, असं त्याने म्हटलंय.

मालिका बंद करण्यात आली?

२१ वर्ष मालिका ज्या गतीने आणि ज्या क्रेझने सुरु होती ते पाहता ती बंद करायला नको होती. यात काही अंतर्गत राजकारण असू शकतं किंवा मग मी याला नियतीचा भाग असं म्हणेन. तरी सुद्धा ही मालिका बंद पाडण्यात आली असं आम्हाला सतत वाटतं, असं दया म्हणाला.

दरम्यान, सीआयडी ही छोट्या पडद्यावर गाजलेल्या मालिकांपैकी एक होती. २०१८ मध्ये ती ऑफएअर केली. परंतु, २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात ती पुन्हा सुरु करण्यात आली होती. या मालिकेत दयानंद शेट्टी, शिवाजी साटम, दिनेश फडणीस, आदित्य श्रीवास्तव, अलाना सय्यद हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते.

टॅग्स :सीआयडीटिव्ही कलाकारशिवाजी साटमसेलिब्रिटी