Join us

स्त्री वेशातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'चला हवा येऊ द्या' नंतर सुरु केलाय स्वत:चा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 15:45 IST

Marathi actor: हा फोटो पाहिल्यावर अनेकांना तो प्रियदर्शन जाधव वा सागर कारंडे असल्याचा भास होत आहे. मात्र, प्रत्यक्षात हा अभिनेता दुसराच आहे.

कलाविश्वातील सेलिब्रिटी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. यात बऱ्याचदा या कलाकारांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफची चर्चा रंगते. तर काही वेळा हे कलाकार स्वत: हून त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या नेटकऱ्यांमध्ये एका अशाच अभिनेत्याच्या एका फोटोची चर्चा रंगलीये.

सोशल मीडियावर सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील एका अभिनेत्याचा स्त्री वेशातील फोटो व्हायरल होत आहे.  त्याचा हा फोटो जुना असून त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर तो शेअर केला आहे. विशेष म्हणजे त्याचा हा लूक पाहिल्यावर अनेकांना स्त्री वेशातील सागर कारंडे आणि प्रियदर्शन जाधव या दोन कलाकारांची आठवण आली. त्यामुळे सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो नेमका कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो सागर कारंडे किंवा प्रियदर्शन जाधव या दोघांपैकी कोणाचाही नाही. हा फोटो आहे. चला हवा येऊ द्या फेम तुषार देवल याचा. तुषारने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या शो संपल्यानंतर तुषारे फूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. बोरीवलीमध्ये तुषारने देवल मिसळ या नावाने हॉटेल सुरु केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या बिझनेसचं त्याने ग्रँड ओपनिंग केलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनचला हवा येऊ द्यासेलिब्रिटीटिव्ही कलाकार