Join us

'चला हवा येऊ द्या 'फेम 'ही' अभिनेत्री आता नव्या रुपात; 'तुझ्या माझ्या संसाराला ..'मध्ये करणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 17:52 IST

Tujhya majhya sansarala ani kay hava: सध्या ही मालिका रंजक वळणावर असून त्यातच आता त्यात 'हवा येऊ द्या'फेम अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे ही अभिनेत्री कोण याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

छोट्या पडद्यावर कायम चर्चेत राहणारा शो म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम, सागर कारंडे असे कित्येक कलाकार आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. मात्र, आता या कार्यक्रमातील एक अभिनेत्री लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही अभिनेत्री आता 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

अलिकडेच झी मराठीवर 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही मालिका सुरु झाली आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर असून त्यातच आता त्यात 'हवा येऊ द्या'फेम अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे ही अभिनेत्री कोण याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, अभिनेत्री स्नेहल शिदम तुझ्या माझ्या.. मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत स्नेहल महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. नुकतंच तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. सध्या तरी स्नेहल या मालिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, ती कोणती भूमिका साकारणार हे अद्यापही गुलदसत्यात आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार