'बिग बॉस १९' च्या घरात दररोज नवीन भांडणं आणि वाद झालेले पाहायला मिळत आहेत. घरातील सदस्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरुन खटके उडत आहेत. आता नुकतंच 'बिग बॉस १९'चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅप्टन बसीर अली आणि मराठमोळा स्पर्धक प्रणीत मोरे यांच्यात घरातील कामांवरून जोरदार भांडण झाले. ही भांडणं इतकी वाढली की त्यांच्यात कामावरून बाचाबाची झाली. काय झालं नेमकं
प्रणित आणि बसीरमध्ये शाब्दिक चकमक
बसीर अलीने प्रणीत आणि झीशान त्यांच्या कामाची जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावर प्रणीतने स्वतःची बाजू मांडत सांगितले की त्याने त्याचे काम केले आहे. प्रणीतने बसीरवर आरोप लावला की तो छोट्या-छोट्या गोष्टींचा मुद्दा बनवतो. प्रणीत म्हणाला, "एक काम करून शंभर वेळा बोलतोस," तर प्रत्युत्तरादाखल बसीरने प्रणीतला कामचोर म्हटले आणि आठवडाभर कामात दुर्लक्ष होत असल्यावर जोर दिला. या भांडणात झीशान कादरीने सुद्धा उडी घेतली. आता प्रणित आणि बसीरचं भांडणं आणखी किती वाढणार, हे 'बिग बॉस १९' पाहून कळेलच.
या भांडणामुळे नुकतीच सुरू झालेली बसीर आणि प्रणीतची मैत्रीही तुटल्याचे दिसून येत आहे. बसीरने स्पष्ट केले की त्याची नाराजी प्रणीतवर वैयक्तिक नाही, तर कामाची जबाबदारी पूर्ण न झाल्यामुळे आहे. अशाप्रकारे 'बिग बॉस १९'च्या घरात मोठी खडाजंगी झाली आहे. सलमान खान आगामी वीकेंड का वारमध्ये प्रणित आणि बसीरवर नाराजी कशी व्यक्त करणार, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.