Join us
Daily Top 2Weekly Top 5

फुल्ल ऑन राडा; बॉलिवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड ओरी 'बिग बॉस 17' मध्ये करणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 13:56 IST

यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

 'बिग बॉस 17' पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त असला तरीदेखील हा शो तितकाच लोकप्रियही आहे. यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता एक मोठे अपडेट समोर आले आहे. 

बिग बॉसच्या घरात अशा व्यक्तीची एन्ट्री होणार आहे, जो सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचे मैत्रीचे संबंध बॉलिवूडमधील प्रत्येक सुपरस्टार्सशी आहेत. हा दुसरा-तिसरा कोणी नसून सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला ओरी अर्थात ओरहान अवतारमणी आहे. आता ओरी लवकरच 'बिग बॉस 17' मध्ये दिसणार आहे. 

 अभिनेता आणि शो होस्ट सलमान खान हा ओरीला घरात पाठवणार आहे. आता, ओरी स्पर्धक म्हणून घरात जाणार आहे की काही दिवस घरात राहिल्यानंतर पाहुणे स्पर्धक म्हणून घर सोडणार आहे, याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. याबाबत अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

ओरहान अवतारमणि एका उद्योगपतीचा मुलगा आहे. तो स्टार किड्सच्या खास मित्रांपैकी एक आहे. ओरहानला पार्ट्यांचा शौक असून तो अनेकदा मोठ्या पार्ट्यांमध्ये दिसतो. ओरी टॉम फोर्ड, व्हिजन ऑफ सुपर आणि प्राडा यांसारख्या काही मोठ्या ब्रँडशी देखील जोडला आहे. ओरी केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही ओळखला जातो. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटीटेलिव्हिजनबिग बॉस