Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg boss: 7 आठवड्यांसाठी रिमी सेनला मिळाले होते 2 कोटी?; अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 14:58 IST

Rimi sen:रिमीला करायचा नव्हता बिग बॉस हा शो करायचा नव्हता. मात्र, तिने हा शो करावा यासाठी मेकर्स तिच्या मागे लागले होते असं तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं.

सध्या सोशल मीडियावर 'बागबान' फेम अभिनेत्री रिमी सेन हिची जोरदार चर्चा रंगली आहे. 2003 मध्ये 'हंगामा' या सिनेमातून रिमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट सिनेमा दिले. परंतु, २०११ नंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. त्यानंतर २०१५ मध्ये रिमी बिग बॉस ९ मध्ये दिसून आली. विशेष म्हणजे तिने या रिअॅलिटी शोची ऑफर नेमकी का स्वीकारली हे सांगितलं.

अलिकडेच रिमीने 'नवभारत टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने बिग बॉस या वादग्रस्त कार्यक्रमाची ऑफर का स्वीकारली हे सांगितलं. विशेष म्हणजे या शो च्या निमित्ताने तिला सलमान खानसोबत पुन्हा काम करायची संधी मिळाली.

"मला कधीच बिग बॉस सारख्या कार्यक्रमात जायचं नव्हतं. पण, मी या शोमध्ये सहभागी व्हावं अशी मेकर्सची प्रचंड इच्छा होती. या शो साठी ते मला मोठी रक्कम ही द्यायला तयार होते. मी सांगेन तितकी रक्कम त्यांनी मला दिली सुद्धा. बिग बॉससाठी मला मेकर्सने २ कोटी रुपये दिले होते. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की मला हा शो करायचा नाहीये, मी यांसारखे शो करत नाही. पण, ते हट्टालाच पेटले होते", असं रिमी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी त्यांना म्हटलं की मला अमूक अमूक ठराविक रक्कम हवीये आणि मी ४ ते ५ आठवडेच फक्त या शो मध्ये राहीन. त्यामुळे जर या अटी मान्य असतील तर ठीक आहे. विशेष म्हणजे ते तयारी झाले. त्यांनी ७ आठवड्यांसाठी मला २ कोटी रुपये दिले. घर चालवण्यासाठी मी कोणतेही फालतू सिनेमा करत नव्हते. पण, त्यांच्या तुलनेत हा शो बरा होता. या शोमध्ये मी खऱ्या आयुष्यात कशी आहे हे लोकांना दिसून आलं. मी कधीही कोणाशी विनाकारण वाद घालत नाही."

दरम्यान, गेल्या १३ वर्षांपासून रिमी अभिनयापासून दूर आहे. २०१६ मध्ये तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. 'बुधिया सिंह-बॉर्न टू रन' या सिनेमाची निर्मिती तिने केली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनबिग बॉससलमान खानटिव्ही कलाकार