Join us

पंकजा मुंडे करणार 'उंच माझा झोका पुरस्कारां'चे निवदेन; ही मराठी अभिनेत्री देणार साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 12:00 IST

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे राजकारणासोबत अनेकदा मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील कार्यक्रमात अनेकवेळा आपण त्यांना हजेरी लावताना बिघतलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे राजकारणासोबत अनेकदा मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील कार्यक्रमात अनेकवेळा आपण त्यांना हजेरी लावताना बिघतलं आहे. अलीकडेच त्या छोट्या पडद्यावरील बस बाई बस (bus bai bus) या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांनी वैयक्तिक आयुष्यात बाबत अनेक खुलासे केले. लवकरच त्या झी मराठीवरील 'उंच माझा झोका'या पुरस्काराचे निवेदन करताना दिसणार आहेत. 

झी मराठीच्या मंचावर प्रेक्षकांना नेहमी प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर होत असतात. ह्या वर्षी देखील  मला अभिमान आहे हे ब्रीद घेऊन स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून  ‘उंच माझा झोका' या  नेत्रदीपक सोहळयाचे सादरीकरण होणार आहे . 'उंच माझा झोका' पुरस्काराचे यंदाचं हे आठव वर्ष आहे.आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल.

 ह्यावर्षीच्या पुरस्काराचे कार्यक्रमाच्या निवेदन धुरा पंकजा मुंडे  आणि क्रांती रेडकर सांभाळणार आहेत.

पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर ह्या दोघींची जुगलबंदी ह्या कार्यक्रमात रंगत आणेल ह्यात शंकाच नाही. सोबतच कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि कलाकारांचे धमाकेदार नृत्याविष्कार अनुभवायला मिळणार आहे. 'उंच माझा झोका' पुरस्कारा २०२२चे झी मराठी वर २८ ऑगस्टला संध्याकाळी ७ :00 वाजता प्रक्षेपण होणार आहे.

टॅग्स :पंकजा मुंडेक्रांती रेडकरझी मराठी