Join us

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस'च्या विजेत्याचे नशीब फळफळणार; ट्रॉफी, रोख रक्कमसह मिळणार 'हे' स्पेशल prize

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 13:58 IST

नुकतंच 'बिग बॉस मराठी'चा नवा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'बिग बॉस' (Bigg Boss Marathi Season 5) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. भांडण, प्रेम, मैत्री अशा सर्व गोष्टींमुळे या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन होतं.  सध्या बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व चांगलेच चर्चेत आहे.  पहिल्याच आठवड्यात घरात वाद, शाब्दिक चकमक आणि राडे दिसून आले आहेत. यंदाच्या 'बिग बॉस'ची बातच न्यारी आहे.  विशेष बाब म्हणजे जो 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता होईल, तो मालामाल होणार आहे. 

नुकतंच 'बिग बॉस मराठी'चा नवा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या विजेत्याला चमकदार ट्रॉफी आणि रक्कमेशिवाय आणखी एक गोष्ट भेटणार असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. ती गोष्ट म्हणजे आकर्षक Diamond jewelleryचा सेट. प्रोमोच्या कॅप्शनमध्ये माहिती देण्यात आली आहे की, 'पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांच्याकडून 'बिग बॉस मराठी'च्या विजेत्याला मिळणार मानाची ट्रॉफी आणि रोख रक्कम आणि याचसोबत असणार आहे स्पेशल प्राईझ. गार्गी बाय पु. ना. गाडगीळ आणि सन्सची आकर्षक Diamond jewellery'. 

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण या स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहण्यासाठी आणि ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी प्रत्येक स्पर्धक खूप मेहनत घेत आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीवर्षा उसगांवकररितेश देशमुख