Join us

Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 20:02 IST

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: टॉप ४ पर्यंत आला पण पुढे खेळ संपला, कोण आहे तो सदस्य?

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी सीझन ५' च्या ग्रँड फिनाले दमदार सुरु आहे. एकामागोमाग एक सदस्य बाहेर जात आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर बाहेर पडल्यावर पुढचं एलिमिनेशन झालं. सदस्यांच्या हातात पाकीट देण्यात आले. त्यातील एकाच्या पाकीटात एलिमिनेटेड असे लिहिले होेते. धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, आणि सूरज चव्हाण यांच्यातील एक सदस्य बाहेर गेला. तो सदस्य आहे धनंजय पोवार(Dhananjay Powar).

कोल्हापूरचा लोकप्रिय सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार म्हणजेच सगळ्यांचा लाडका डीपी टॉप ३ च्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. चारही सदस्यांच्या कुटुंबाच्या उपस्थित हे एलिमिनेशन पार पडलं. यावेळी धनंजयसोबत त्याची पत्नी होती. धनंजयने टॉप ४ पर्यंत बाजी मारली. मात्र टॉप ३ पर्यंत तो पोहोचू शकला नाही. सर्व कोल्हापूरकरांसाठी आणि डीपीच्या चाहत्यांसाठी हा धक्का आहे. एलिमिनेशननंतर धनंजय पोवार गंमतीत म्हणाला, "प्रवास खूप चांगला होता. १० टक्के झोपेने मार खाल्ला."

आता बिग बॉसला टॉप ३ सदस्य मिळाले आहेत. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी यांच्यातील कोण ट्रॉफी जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान या तिघांपैकी आता कोण बाहेर जाणार हे थोड्यावेळात समजणार आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीसोशल मीडिया