Join us

"तुमची अ‍ॅक्टिंग, तुमचा डान्स अन् 'Bigg Boss' चं अ‍ॅंकरिंग तर..." सिद्धार्थ जाधवने केलं रितेशचं 'लयभारी' कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 13:27 IST

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन रितेश देशमुख होस्ट करत असल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. 

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन रितेश देशमुख होस्ट करत असल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. त्यातच अभिनेता सिद्धार्थ जाधवनेरितेश देशमुखच्या सूत्रसंचालनाचं कौतुक करणारी एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीने बिग बॉस प्रेमींचं लक्ष वेधलं आहे. 

सिद्धार्थ जाधवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये सिद्धुने लिहलंय, "रितेश सर, तुमची अ‍ॅक्टिंग भारी, तुमचा डान्स भारी आणि तुमचं चं अ‍ॅंकरिंग तर सगळ्यात लय भारी". असं लिहून सिद्धार्थने रितेश देशमुखसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. शिवाय त्याला टॅगही केलंय.

बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक-

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. 

दरम्यान, पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील घराच्या बाहेर पडले आहेत. त्यांचा या पर्वातील प्रवास इथेच संपला आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीसिद्धार्थ जाधवरितेश देशमुखसेलिब्रिटीसोशल मीडियासोशल व्हायरल