Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गोव्याला जाऊन काय करता?' पॅडीची फिरकी घेताना बिग बॉस म्हणाले-'निक्कीच्या बोटीत तुम्ही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 12:39 IST

बिग बॉस मराठीमध्ये आज धमाल मस्ती होताना दिसणार असून बिग बॉस सर्वांची फिरकी घेताना दिसणार आहे (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये अनेक सदस्य त्यांच्या उत्कृष्ट खेळाने प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत. काल बिग बॉसच्या घरात धमाकेदार डान्स झाले. याशिवाय नॉमिनेटेड असलेल्या सदस्यांपैकी अंकिताला घराबाहेर पाठवण्याचं नाटक बिग बॉसने केलेलं दिसलं. याशिवाय सर्वांनाच पुढच्या खेळासाठी ताकीद दिली. आज पाचवा आठवडा सुरु होणार असून पहिल्याच दिवशी बिग बॉस निवांत सदस्यांची फिरकी घेताना दिसणार आहे.

बिग बॉसने घेतली पॅडीची फिरकी

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत पॅडी ब्लॅक रंगाचा शर्ट घालून वैभव चव्हाण आणि धनंजय पोवारसोबत बसलेला दिसतोय. पॅडीला बिग बॉस पुकारतो, "पंढरीनाथ, शर्ट मस्त आहे. गोव्याचा प्लॅन आहे का?" त्यावर पॅडी हसतो अन् म्हणतो, "हो आय लव्ह गोवा बिग बॉस. माझं ड्रीम डेस्टिनेशन आहे गोवा." पुढे बिग बॉस पॅडीला विचारतात, "काय करता गोव्याला जाऊन?" मग पॅडी सांगतो की, "गोव्याला नाटकांचे प्रयोग आणि सिनेमाचं शूटींग असतं. तर त्यासाठी वरचेवर गोव्याला जावं लागतं." मागे धनंजय हसताना दिसतो. पुढे बिग बॉस म्हणतात, "धनंजय मात्र काहीतरी वेगळंच बोलताना दिसत आहेत."

पॅडी आला निक्कीच्या बोटीत

बिग बॉसने धनंजयचं नाव घेताच पॅडी हसला अन् म्हणाला, "तुम्ही धनंजयलाच विचारा बिग बॉस. मी वेगळ्या बोटीत आलो", असं म्हणत पॅडी निक्कीच्या बाजूला जाऊन बसतो. पुढे बिग बॉस म्हणतात, "निक्कीच्या बोटीत आलात आपण", असं म्हणताच पॅडीची हसून हसून पुरेवाट होते. घरातले सदस्यही मनमुराद हसतात. अशाप्रकारे बिग बॉसने पॅडीची चांगलीच फिरकी घेतलेली दिसली. एरवी एकमेकांसोबत भांडणारे सदस्य आज मात्र घरात मजा-मस्ती करताना दिसणार आहेत.

टॅग्स :बिग बॉस मराठीभात