'बिग बॉस मराठी'मुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर प्रसिद्धीझोतात आली. जान्हवीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना अपडेट देत असते. तिने नवी कोरी कार घरी आणली आहे. याचा व्हिडिओ जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
जान्हवी किल्लेकरने महिंद्रा कंपनीची XUV700 ही गाडी खरेदी केली आहे. काळ्या रंगाची एक्स यू व्ही जान्हवीने घरी आणली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या नव्या कोऱ्या गाडीची झलक पाहायला मिळत आहे. पती, मुलगा आणि कुटुंबीयांसह जान्हवी गाडी खरेदी करण्यासाठी गेली होती. गाडीची पूजा केल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या हातांचे ठसे गाडीच्या बोनेटवर उमटवल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. जान्हवीच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे.
जान्हवीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'आई माझी काळुबाई', 'जय जय स्वामी समर्थ', 'भाग्य दिले तू मला' या मालिकांमध्ये ती दिसली होती. तर काही अल्बम साँगमध्येही तिने काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये जान्हवी सहभागी झाली होती. त्याबरोबरच या सीझनच्या टॉप ५ फायनलिस्टपैकी ती एक होती.