Irina Rudakova with Akshay Kumar: 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व प्रचंड गाजलं. पाचव्या पर्वात सहभागी झालेल्या 'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवा हिने प्रेक्षकांची मनं जिंकली. इरिनाचं मराठी प्रेम हे प्रेक्षकांना भावलं. तीच 'परदेसी गर्ल आता प्रेक्षकांसमोर एका नव्या रूपात आली आहे, ते ही थेट हिंदी चित्रपटातून. इरिना रुडाकोवा हिला अक्षय कुमारबरोबर 'हाऊसफुल ५' मध्ये झळकली आहे.
नुकतंच 'हाऊसफुल ५' या सिनेमातील नवीन गाणं 'दिल ए नादान' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, नर्गिस, जॅकलिन, सोनम बाजवा या सगळ्या कलाकारांची झलक प्रेक्षकांना या गाण्यात पाहायला मिळत आहे. पण, या गाण्यात लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे 'परदेसी गर्ल'नं. 'दिल ए नादान' या गाण्यात इरिना ही अक्षयबरोबर डान्स करताना दिसून आली आहे. हे पाहून इरिनाचे मराठी चाहते खूश झालेत. पण, इरिना केवळ गाण्यात झळकणार की, चित्रपटातही तिची महत्त्वपूर्ण भूमिका असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते स्पष्ट होईलचं.
'हाऊसफुल ५' हा "हाऊसफुल' या फ्रेंचाइजीचा पाचवा भाग आहे. याआधी एकूण चार भाग प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसह १८ दमदार कलाकारांची फौज आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात केवळ कॉमेडीच नाहीतर एका खुनाचा गूढ थरार पाहायला मिळणार आहे. जे प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे. येत्या ६ जूनला हा बहुचर्चित चित्रपट सर्वत्र रिलीज करण्यात येणार आहे.
इरिना रुडाकोवा बद्दल बोलायचं झालं तर ती ती प्रसिध्द मॉडेल तसेच योग अभ्यासात पारंगत आहे. 'छोटी सरदारनी' या कलर्सच्या टिव्ही शोमध्ये इरिनाने अभिनय केलेला आहे. तसेच 'इंद्रायणी' या मराठी मालिकेतही ती झळकली होती. शिवाय IPL मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची चीअरलीडर म्हणून देखील तिने काम केलं आहे.