कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्धी मिळवलेली अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी ५'मधून घराघरात पोहोचली. 'बिग बॉस मराठी ५'च्या टॉप ५ फायनलिस्टपैकी अंकिता एक होती. काही महिन्यांपूर्वीच अंकिताने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अंकिताने कुणाल भगतसह लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर अंकिता पतीसह युरोपात फिरायला गेली आहे.
अंकिताने तिच्या सोशल मीडियावरुन युरोप ट्रिपचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अंकिताने नुकतंच फ्रान्समधील पॅरिस येथील प्रसिद्ध अशा आयफेल टॉवरला भेट दिली. याचा फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. अंकिता पती कुणाल भगतसह युरोपात व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. कुणालसह तिची ही पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप आहे.
अंकिता आणि कुणालने फेब्रुवारी महिन्यात कोकणात लग्नगाठ बांधली. सिंधुदुर्ग वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात अंकिता-कुणालने कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सात फेरे घेतले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कुणाल हा पेशाने गायक आणि संगीतकार आहे.