Join us

किशोरी शहाणेंच्या आईचे घर या कारणामुळे बनले होते मॅटर्निटी वॉर्ड, वाचून तुम्हाला येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 07:15 IST

किशोरी यांनी हिना पांचाळ यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या आयुष्यातील एक मजेशीर गोष्ट सांगितली.

ठळक मुद्देमी आणि माझ्या दोन बहिणी एकाच वेळी गरोदर होतो. त्यामुळे आमच्या सगळ्याच्या आयुष्यात एकत्र आनंदाचे क्षण आले होते. त्यावेळी फोटो शूट वगैरे प्रकारच नव्हता. नाहीतर आम्ही सेल्फी, फोटो काढून प्रचंड धमाल मस्ती केली असती.

'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. या कार्यक्रमात यंदाच्या आठवड्यात विद्याधर जोशी घराच्या बाहेर पडले असून सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी कोण स्पर्धक विजेता ठरणार याचा प्रत्येकजण अंदाज लावत आहे. 

बिग बॉस मराठीमधील सगळ्या स्पर्धकांमध्ये देखील आता खूप चांगली मैत्री झाली असून ते एकमेकांच्या आयुष्यातील खास गोष्टी रिकाम्या वेळात शेअर करत असल्याचे दिसून येत आहे. 

बिग बॉस मराठी २ मधील स्‍पर्धक एकमेकांसोबतच नव्हे तर कॅमेऱ्यासमोर देखील प्रांजळपणे त्‍यांच्‍या कथा शेअर करत आहेत. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये किशोरी शहाणे यांनी त्यांच्या आयुष्यातील एक खूप रंजक किस्सा सांगितला. हा किस्सा वाचल्यानंतर तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

किशोरी यांनी हिना पांचाळ यांच्याशी गप्पा मारताना सांगितले की, माझ्या कुटुंबियांसाठी हा एक सुंदर योगायोग होता. मी आणि माझ्या दोन बहिणी एकाच वेळी गरोदर होतो. त्यामुळे आमच्या सगळ्याच्या आयुष्यात एकत्र आनंदाचे क्षण आले होते. त्यावेळी फोटो शूट वगैरे प्रकारच नव्हता. नाहीतर आम्ही सेल्फी, फोटो काढून प्रचंड धमाल मस्ती केली असती. प्रेग्‍नंट पोट घेऊन आम्ही तिघींनीही फोटो काढले असते तर ते क्षण कायमचे स्मरणात राहिले असते. मी आणि माझ्या दोन्ही बहिणींचे बाळंतपण आमच्या माहेरीच झाले. त्यामुळे माझ्या आईचे घर मॅटर्निटी वॉर्ड झालेले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. माझा मुलगा, मोठ्या बहिणीचा मुलगा आणि धाकट्या बहिणीची मुलगी या तिघांमध्ये केवळ १५-२० दिवसांचा गॅप आहे. त्यामुळे त्यांच्यात खूपच छान बॉण्डिंग आम्हाला पाहायला मिळते.  

किशोरी शहाणेंची ही गोष्ट ऐकून हिना अगदी आश्चर्यचकितच झाली. किशोरी शहाणे यांचा मुलगा आता लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तो सध्या मॉडलिंग करत असून या क्षेत्रात त्याने त्याचे चांगले नाव कमावले आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीकिशोरी शहाणे