Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्या ५० लोकांमध्ये मी नव्हते'; लग्नाला न बोलावल्यामुळे शर्मिष्ठा- मेघामध्ये लुटूपुटूचं भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 14:07 IST

Marathi actress: या मुलाखतीमध्ये शर्मिष्ठा आणि मेघा यांनी पर्सनल लाइफसोबत प्रोफेशनल लाइफवरही चर्चा केली.

छोट्या पडद्यावर गाजलेला पण तितकाच लोकप्रिय असलेला रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी. आतापर्यंत या शोचे ४ पर्व पार पडले आहेत. मात्र, प्रत्येक पर्वामधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यात आलं. यामध्येच या कार्यक्रमामुळे कलाविश्वाला अशा काही कलाकारांच्या जोड्या मिळाल्या ज्यांच्यातील मैत्री आजपर्यंत टिकून आहे. यात खासकरुन विकास पाटील- विशाल निकम, सोनाली पाटील- मिनल शहा या जोडींचं नाव आवर्जुन घेतलं जातं. परंतु, यांच्या व्यतिरिक्त अजून एक अशी जोडी आहे ज्यांची मैत्री कायम गाजत असते. ती जोडी म्हणजे शर्मिष्ठा राऊत आणि मेघा धाडे. या दोघींमधील मैत्री फार जुनी आहे. मात्र, असं असतानाही शर्मिष्ठाने मेघाला तिच्या लग्नाला बोलावलं नव्हतं.

अलिकडेच शर्मिष्ठा आणि मेघा या दोघींनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले. इतकंच नाही तर आमच्यात चांगली मैत्री असतानाही शर्मिष्ठाने तिच्या लग्नात मला बोलावलं नाही, अशी गोड तक्रार मेघाने या मुलाखतीत केली. मेघाच्या या तक्रारीवर शर्मिष्ठानेही लग्नाला न बोलावण्यामागचं कारण सांगितलं.

मेघा आणि शर्मिष्ठाने 'लोकमत फिल्मी'च्या 'आपली यारी' या सेगमेंटमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी 'तू शर्मिष्ठाच्या लग्नाला का गेली नव्हतीस?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, "तिने मला बोलावलंच नव्हतं. शमा तू याच्यावर काही सफाई देऊ नकोस. कोविडमध्ये ५० लोकांना आमंत्रण होतं त्या ५० जणांमध्ये मी नव्हते", असं मेघा म्हणाली. त्यावर,  ''असं काही नाहीये. ५० लोकांची लिमेटेशन होती आणि त्या लोकांमध्ये लग्न करणं मला भाग झालं होतं. कारण, मी आधीच पुढे ढकललं तर पुढे काय होईल माहित नव्हतं. लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत मी शूट करत होते. ग्रहमख करुन हळद लागलेली असताना मी शूट करत होते. कारण, मालिकेचा २ दिवसांचा टेलिकास्ट बाकी होता. त्यामुळे लग्नाच्या दिवशी सुद्धा मी सकाळी शूट केलं आणि दुपारी मुहूर्ताला पोहोचले, असं शर्मिष्ठाने सांगितलं." दरम्यान, या मुलाखतीमध्ये शर्मिष्ठा आणि मेघा यांनी पर्सनल लाइफसोबत प्रोफेशनल लाइफवरही चर्चा केली. त्यामुळे सध्या त्यांची ही मुलाखत चर्चेत येत आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीमेघा धाडेसेलिब्रिटीटेलिव्हिजन