Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ कधी सुरु होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी हिंदी 'बिग बॉस सीझन १९' च्या फिनालेमध्ये रितेश देशमुखने हजेरी लावत 'बिग बॉस मराठी ६'ची घोषणा केली. यासोबत रितेशच यावेळीही होस्ट असणार हे कन्फर्म झालं. तर आता 'बिग बॉस मराठी ६'कधीपासून सुरु होणार? याची तारीखही समोर आली आहे. कलर्स मराठी वाहिनीने नवा प्रोमो शेअर करत तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.
'स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय', असं म्हणत रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी सीझन ६. रितेश भाऊंचा मस्त लूक, दमदार स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. 'मागचा सीझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय...आहात ना तय्यार!' भाऊच्या या वाक्याने प्रेक्षकांची धडधड अजूनच वाढली आहे. नव्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील सीझनने जबरदस्त धुमशान घातलं आणि यंदाच्या सीझनमध्येही तोच स्वॅग असणार आहे, पण पॅटर्न रितेश भाऊंचा असणार आहे. काय पॅटर्न असणार? कसा लूक असणार? सदस्य कोण असणार? सगळं अजून गुलदस्त्यात आहे. 'बिग बॉस मराठी सीझन ६' येत्या ११ जानेवारीपासून सुरु होत आहे. कलर्स मराठीने प्रोमो शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे.
भाऊच्या एंट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीचे वातावरण, ढोल–ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल २५० ते ३०० लोकांची दणदणीत उपस्थिती या सगळ्यांच्या साक्षीने बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा लार्जर-दॅन-लाईफ प्रोमो पार पडला. रितेश भाऊने पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषा केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये त्याचा दिसणारा स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या नव्या प्रोमोने बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा बिगुल वाजला आहे. दरम्यान, सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे आणि चर्चेत आहेत प्रोमोमधले रितेश भाऊंचे कडक डायलॉग... घरात कुणाचा नवस पूरा होणार? तर कुणाच्या सलामीने वातावरण झिंगणार? “काही असेही असणार… पण, मी गप्प नाही बसणार...! अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत लवकरच!
Web Summary : Bigg Boss Marathi 6 starts January 11th on Colors Marathi. Hosted by Riteish Deshmukh, the show promises a new pattern and grand set. Time changed to 8 PM.
Web Summary : कलर्स मराठी पर बिग बॉस मराठी 6, 11 जनवरी से शुरू हो रहा है। रितेश देशमुख द्वारा होस्ट किए जाने वाले इस शो में एक नया पैटर्न और भव्य सेट का वादा किया गया है। समय बदलकर रात 8 बजे कर दिया गया है।