Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi: "अत्यंत गलिच्छ राडा घातला.."; तन्वीचा गेम पाहून किरण मानेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 10:37 IST

Kiran mane: बिग बॉस मराठीविषयी किरण मानेंची पोस्ट

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत येणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी. या शोचा ६ वा सीझन सध्या सुरु असून तो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नुकतीच या शोमधून रेवा कौरासे ही एलिमिनेट झाली. परंतु, ती बाहेर पडतांना तन्वीने जे वक्तव्य केलं ते पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. रेवा घराबाहेर पडतांना  'खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली आणि चांगल्या मनाची पोरगी बाहेर गेली,' असं तन्वी म्हणाली. तिच्या या वाक्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. यातच बिग बॉस मराठीचे एक्स स्पर्धक किरण माने यांनीही तन्वीवर टिकेची झोड उठवली. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या किरण माने यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी तन्वीला चांगलंच सुनावलं आहे. 

नेमकं काय म्हणाले किरण माने?

''यावेळी टॉप फाईव्ह जाहीर झाल्यावर अख्ख्या घरात तन्वीने जो 'मातम' घातला त्यामुळे हा दिवस आठवला... ‘बिग बॉस’च्या आमच्या सिझनला ‘टॉप फाईव्ह’मध्ये आल्यावर तो क्षण आम्ही पाचही जणांनी फुल्ल एंजॉय केला होता.अपूर्वा नेमळेकर ९८ दिवस माझी कट्टर विरोधक होती. सगळ्यात भयानक वाद आमचे झाले होते…पण पहिला फायनलिस्ट म्हणून माझे नांव फायनलिस्ट म्हणून जाहीर झाल्यानंतर तिनं टाळ्या वाजवत मिठी मारून माझे अभिनंदन केले होते. अक्षय-अमृता त्यात आल्यावर कटुता विसरून मी त्यांचा हातात हात घेतला होता. राखी तर घट्ट मैत्रीणच होती. प्रतिस्पर्धी असला तरी त्याच्या अचिव्हमेंटचा आदर करणे हे आपलं मन मोठं असल्याचं लक्षण असतं.'' 

''आत्ता या सीज़नला टॉप फाईव्ह जाहीर झाल्यावर तन्वीनं जो अत्यंत गलिच्छ राडा घातला तो पाहून विशाल-अनुश्रीसाठी वाईट वाटलं आणि दीपाली राकेश साठीही. बिचाऱ्यांना तो क्षण तन्वीनं पुरेसा साजराही करू दिला नाही. काय मेंटॅलिटी असेल ही? खूप खूप खूप खूप कष्ट आणि मानसिक शारीरिक सामर्थ्याची सीमा पार करून लोक इथवर पोहोचलेले असतात. अशावेळी प्रतिस्पर्ध्याच्याही मेहनतीचा आदर ठेवायला आपण चांगले ‘माणूस’ असावे लागते. खिलाडूवृत्ती असावी लागते. सिझनभर विशालला अहंकारी म्हणणारी तन्वी शेवटी अहंकारी निघाली. अहंकारी असता तर विशाल राकेशला स्वतःहून सॉरी म्हणाला नसता. सगळ्यांनी सिझनभर अनुश्रीचे संस्कार काढले. शेवटी तन्वीने एवढ्या शिव्या देऊन, अपमान करूनही अनुश्रीने तन्वीला साखर भरवली… हे खरे संस्कार. म्हणून मी म्हणतो, अनुश्री-विशाल तुम्ही मन जिंकले ! मनं जिंकणं महत्वाचं… बाकी ट्रॉफी वगैरे फार मॅटर करत नाही'', अशी पोस्ट किरण माने यांनी शेअर केली आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठी ६ मध्ये राकेश बापट, दिपाली सय्यद, तन्वी कोलते, विशाल कोटियन आणि अनुश्री माने हे टॉप ५ फायनलिस्ट झाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi: Kiran Mane slams Tanvi's dirty game after finale.

Web Summary : Bigg Boss Marathi's Kiran Mane criticizes Tanvi's behavior after the top five finalists were announced. He contrasts her actions with the sportsmanship displayed in his season, praising Anushree and Vishal's maturity.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टेलिव्हिजनकिरण मानेसेलिब्रिटीटिव्ही कलाकार