Join us

घरात येताच संग्रामचा थेट निक्कीशी पंगा, टास्कमध्ये अभिनेत्रीला पाण्यात ढकललं अन्...; आता काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 12:20 IST

Bigg Boss Marathi Season 5 : आधी अरबजशी पंगा आता निक्कीला भिडला, घरात येताच संग्रामचा राडा

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली आहे. संग्रामने घरात एन्ट्री घेताच सदस्यांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं. पण, बिग बॉसच्या घरात येताच संग्रामने थेट घर डोक्यावर घेणाऱ्या निक्की तांबोळीशी पंगा घेतला आहे. 

बिग बॉसच्या घरात या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या कार्यात अपात्र असणाऱ्या सदस्यांना स्विमिंगपूलच्या जादुई विहिरीत पडायचं आहे. या टास्कदरम्यानचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये घरातील काही सदस्य विहिरीत उडी घेताना दिसत आहेत. संग्राम निक्कीला या विहिरीत उडी घेण्यास सांगत असल्याचं दिसत आहे. तेव्हा निक्की बिग बॉसला म्हणते, "मी मेडिकल कंडिशनमुळे पाण्यात उतरू शकत नाही". निक्कीने पाण्यात उडी मारण्यास नकार दिल्यानंतर संग्राम म्हणतो, "बिग बॉस मी यांना पाण्यात ढकलणार आहे". त्यावर निक्की त्याला म्हणते की "तुम्ही मला सांगूच शकत नाही". 

तेवढ्यात संग्राम निक्कीला पाण्यात ढकलून देत असल्याचं पाहायला मिळत आहे. पाण्यातून बाहेर आल्यानंतर निक्की संग्रामला चॅलेंज देते. "माझ्याआधी हा घरातून बाहेर नाही गेला तर माझं नाव बदला", असं निक्की म्हणताना दिसत आहे. त्यावर संग्रामही रिअॅक्शन देताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घनश्याम दरवडेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. त्यानंतर घरात संग्रामची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्याने घरातील समीकरणं पुन्हा बदलल्याचं दिसणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार