Join us

गुडघ्याला बाशिंग बाधून तयार आहे सूरज चव्हाण! 'बिग बॉस' संपल्यानंतर करणार लग्न? म्हणाला- "बाहेर गेल्यावर लगेच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:54 IST

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस'मधून बाहेर गेल्यावर सूरजला करायचंय लग्न, म्हणाला- "बाहेर मुली या किंगची वाट बघत असतील..."

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या या नव्या सीझनमध्ये सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. पण, सूरजने त्याचा झापुक झुपूक अंदाज दाखवत प्रेक्षकांबरोबरच घरातील सदस्यांचीही मनं जिंकली. या आठवड्यात सूरज घराचा कॅप्टन झाला आहे. त्याचा घरातील खेळही प्रेक्षकांना आवडत आहे. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरचा प्लॅन सूरजने सांगितला आहे. 

सूरजला आता लग्नाचे वेध लागले आहेत. घनश्यामबरोबर बोलताना त्याने बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यावर लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे. घनश्याम आणि सूरजचा बिग बॉसच्या घरातील व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत घनश्याम सूरजला म्हणतो की "माझ्या लग्नात तू एक महिना आधी यायला हवास. शूटिंगचं वगैरे सगळं सोडून तुला एक महिना आधी यावं लागेल". त्यावर सूरज त्याला म्हणतो "हो तुझ्यासाठी नक्की येणार". नंतर धनश्याम सूरजच्या लग्नाचा विषय काढतो. तो म्हणतो, "माझ्याआधी तुझं लग्न करावं लागेल. आम्हाला मेकअप करायला वहिनी पाहिजे. आम्हाला हक्काची वहिनी पाहिजे". 

"गेल्यावर लगेच लग्न करणार", असं सूरज म्हणतो. तेव्हा घनश्याम त्याला "तुझं लग्न धुमधडाक्यात करायचं. लग्नात घोडा आणायचा. लग्नाचा सगळा खर्च आपण करू. नवरीच्या लोकांनी नाही केला तरी चालेल. तुझ्या लग्नाला किती दिवस आधी येऊ?",असं विचारतो. त्यावर सूरज त्याला म्हणतो, "ये की महिनाभर आधी. मला लगेच लग्न करायचं आहे. तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे". त्यानंतर घनश्याम त्याला तुझ्यासाठी वहिनी आम्ही शोधणार असं म्हणतो. तेव्हा सूरज त्याला म्हणतो, "शोधा...आता मुली बाहेर किंगची वाट बघत असतील". 

दरम्यान, या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, धनंजय पोवार यांना नॉमिनेट केलं आहे. गेल्या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण, या आठवड्यात मात्र एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार