Join us

Bigg Boss Marathi 5 : "दादाचा पत्ता कट करायला हवा", पॅडीमुळे वाढली निक्की आणि वैभवची डोकेदुखी, वाटतेय भीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 13:35 IST

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : पॅडीने त्याचा गेम दाखवायला सुरुवात केली आहे. नुकतंच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये पॅडीने त्याचा चांगला खेळ दाखवला. यावरुन निक्की आणि वैभवमध्ये चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय. घरात टिकून राहण्यासाठी सदस्य टीमबरोबर नवनवीन स्ट्रॅटेजी बनवताना दिसत आहेत. यंदाच्या पर्वात पंढरीनाथ कांबळेदेखील सहभागी झाला आहे. अभिनय आणि उत्कृष्ट विनोद शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा पॅडी सुरुवातीला घरात शांत दिसत होता. टास्कमध्येही तो फारसा कुठे दिसला नाही. त्यामुळेच भाऊच्या धक्क्यावर रितेशने त्याची शाळाही घेतली होती. आता मात्र पॅडीने त्याचा गेम दाखवायला सुरुवात केली आहे. 

नुकतंच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये पॅडीने त्याचा चांगला खेळ दाखवला. यावरुन निक्की आणि वैभवमध्ये चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. बिग बॉसच्या घरातील निक्की आणि वैभवचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते पॅडीबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. "पॅडी दादा असेच खेळत राहिले तर पुढे जातील. आणि त्यांना आपल्याला पुढे जाऊ द्यायचं नाहीये. ते असेच स्मार्टली खेळत राहिले तर ते पुढे जातील आणि त्या आधीच आपल्याला त्यांचा पत्ता कट करायचा आहे", असं निक्की वैभवशी बोलताना दिसत आहे. 

दरम्यान, या आठवड्यात सदस्यांना घरातील दोन चिमुकल्या पाहुण्यांना सांभाळण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या छोट्या पाहुण्यांचा सांभाळ करताना घरातील सदस्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या नाकीनऊ आल्याचं दिसत होतं. या टास्कमध्ये टीम A विजयी झाली. 

बिग बॉसने या आठवड्यात अभिजीत आणि अरबाजला विशेष पॉवर कार्ड दिले होते. यामध्ये अभिजीतने पॅडीला तर अरबाजने निक्कीला नॉमिनेशनपासून सेफ केलं. तर नंतर वैभवने पॉवर कार्डचा वापर करून घनश्यामला सेफ करत  अभिजीत सावंतला नॉमिनेट केलं. त्यामुळे आता या आठवड्यात योगिता चव्हाण, निखिल दामले, सूरज चव्हण, अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार