Join us

गुलिगत कॅप्टन , झापुक झुपूक! सूरज कॅप्टन झाल्यानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "एक साधा खरा माणूस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 17:11 IST

Bigg Boss Marathi Season 5 : सूरज चव्हाणने यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्याचा मान मिळवला. सूरज घराचा कॅप्टन झाल्यानंतर घरातील सदस्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला.

Bigg Boss Marathi Season 5 : सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने गुलीगत यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्याचा मान मिळवला. बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी टास्क पार पडला. बिग बॉसच्या घरातून कॅप्टन्सी कंटेन्डरची बस सुटली. या बसचा प्रवासी होऊन घराचा कॅप्टन होण्याच्या शर्यतीत टिकून राहायचं होतं. या कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज चव्हाणने बाजी मारली आणि तो घराचा कॅप्टन झाला. 

सूरज घराचा कॅप्टन झाल्यानंतर घरातील सदस्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. सदस्यांनी एकत्र येत सूरजच्या कॅप्टन्सीचं सेलिब्रेशन केलं. मराठी अभिनेत्यालाही सूरज चव्हाण कॅप्टन झाल्याने आनंद झाला आहे. कॅप्टन झाल्यानंतर पुष्कर जोगने सूरजसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. "गुलीगत कॅप्टन...झापुक झुपूक. एक साधा खरा माणूस...सूरज...मित्रा खूप आनंद झाला तुझ्यासाठी...तू बिंधास्त भीड...जो माणुसकी जपतो त्याला देव जपतो", असं पुष्करने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, धनंजय पोवार यांना नॉमिनेट केलं आहे. गेल्या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण, या आठवड्यात मात्र एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार