Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी'मध्ये आलिया भटची एन्ट्री, रितेशचं केलं कौतुक, म्हणाली- "हा शो टॉपमध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 20:34 IST

Bigg Boss Marathi 5 Finale : ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने एन्ट्री घेतली. आलियाने तिच्या जिगरा या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने बिग बॉस मराठीमध्ये हजेरी लावली.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले सुरू आहे. कोणता स्पर्धक ट्रॉफी जिंकून यंदाच्या पर्वाचा विजेता होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने एन्ट्री घेतली. आलियाने तिच्या जिगरा या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने बिग बॉस मराठीमध्ये हजेरी लावली. तिच्यासोबत अभिनेता वेदांग राणा आणि दिग्दर्शक वसन बालादेखील उपस्थित होते. 

बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये येताच आलियाने शोचं आणि रितेश देशमुखच्या अँकरिंगचंही कौतुक केलं. ती म्हणाली, "बिग बॉस मराठीचं नाव ऐकताच आम्ही लगेचच निघालो. या शोमध्ये येण्याची उत्सुकता होती. बिग बॉस सध्या मराठी टॉपमध्ये आहे. आणि रितेश भाऊ तुमची अँकरिंग तर लय भारी आहे".  

अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट होते. जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये घेत बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. त्यानंतर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. अंकिता पाठोपाठ धनंजय पोवारलाही बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली. आता निक्की तांबोळी, सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे सदस्य टॉप ३ मध्ये आहेत. त्यांच्यापैकी कोण बिग बॉस मराठी ५च्या ट्रॉफीवर नाव कोरणार, यासाठी चाहते उत्सुक आहेत.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारआलिया भटरितेश देशमुख