Join us

गुलिगत किंग सूरज चव्हाणचा मोठा निर्णय, नवीन घर बांधून त्याला देणार 'हे' खास नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 11:55 IST

सूरज चव्हाणने त्याच्या विशेष स्टाइलने प्रेक्षकांना आपलंसं केलंय.

Bigg Boss Marathi Suraj Chavan : मराठी मनोरंजनाचा बॉस अर्थात 'बिग बॉस मराठी'ची संपुर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे. यंदाच्या पर्वात एकापेक्षा एक अवली सदस्य आहेत. त्यातीलच एक चर्चेत असणारं नाव म्हणजे गुलिगत किंग सूरज चव्हाण. सूरज चव्हाणने त्याच्या विशेष स्टाइलने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. गावाकडून आलेल्या साध्या घरात राहणाऱ्या सुरज चव्हाणवर अख्खा महाराष्ट्र प्रेम करतोय.  सूरज चव्हाणला 'बिग बॉस'च्या बाहेर गेल्यानंतर स्वत:चं घर बांधायचं आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण, त्या घराला तो कुणाचं नाव देणार याचा खुलासा त्याने केलाय. 

'बिग बॉस मराठी' च्या (Bigg Boss Marathi) घरात नुकतेच ग्रँड सेलिब्रेशन पार पडले आहे. आपला आजवरचा प्रवास पाहून सर्वांचे डोळे पाणावले. ग्रँड सेलिब्रेशननंतर सुरच चव्हाणही भावूक झाल्याच पाहायला मिळालं. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. शीव ठाकरेशी बोलताना सुरजने आपलं मन मोकळ केलं. गावाकडे गेल्यावर स्वतःचं घर बांधणार असल्याचं तो म्हणाला. तसेच नवीन घराला 'बिग बॉस'चे नाव देणार असल्याचं त्याने सांगितलं. 

तो म्हणाला, "आपले आई-बाप असेल, तर जीवन आहे नाहीतर काहीच नाही…कोण कोणाला विचारत नाही. मी कोणत्या परिस्थितीतून वर आलोय, हे माझं मला माहिती आहे. देवीच्या जत्रेला गेल्यावर लोक नावं ठेवायचे, काही बोलायचे पण, आता सगळं बदललं आहे. मला खूप मोठी संधी मिळाली, याचं मी नक्की सोनं करणार आहे. मला हा माझा प्रवास पाहून खूपच भारी वाटलं. मी 'बिग बॉस'ला कधीच विसरणार नाही. आता हा शो संपल्यावर मी बाहेर जाऊन घर बांधणार आणि त्या घराला मी 'बिग बॉस'चं नाव देणार आहे. झापुक झुपूक 'बिग बॉस' गुलीगत…बुक्कीत टेंगूळ आणि मी ही ट्रॉफी नक्की जिंकणार".

 'बिग बॉस'च्या घरात आता शेवटचे काही दिवस उरले आहेत. निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पवार आणि सुरज चव्हाण यांच्यापैकी आता बिग बॉस मराठी' च्या घरातून कोण बाहेर जाणार आणि बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोण उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.   येत्या ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा होणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीसुंदर गृहनियोजन