Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी'नंतर इरिनाला लागली लॉटरी! परदेसी गर्लची मराठी मालिकेत एन्ट्री, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 13:46 IST

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच इरिनाच्या हाती मोठा प्रोजेक्ट लागला आहे. परदेसी गर्ल इरिनाची मराठी मालिकेत एन्ट्री झाली आहे.

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये परदेसी गर्ल इरिना रुडाकोव्हाला पाहून चाहत्यांनी आश्चर्याचा धक्का बसला होता. इरिनाने तिच्या मराठमोळ्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. अगदी काही आठवड्यांतच इरिनाचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला. पण, असं असलं तरी इरिनाने प्रेक्षकांच्या मनावर तिची छाप पाडली होती. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच इरिनाच्या हाती मोठा प्रोजेक्ट लागला आहे. परदेसी गर्ल इरिनाची मराठी मालिकेत एन्ट्री झाली आहे. 

बिग बॉस मराठीनंतर इरिनाला लॉटरी लागली आहे. बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी इरिना आता मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकादशीचा उपवास धरणाऱ्या इरिनाची कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत एन्ट्री झाली आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये इंदूचा शोध घेत इरिना गावात येत असल्याचं दिसत आहे. या प्रोमोमध्ये इरिना अस्खलित मराठीही बोलताना दिसत आहे. "इंद्रायणी वाडेकर आहेत का? राम कृष्ण हरी" असं इरिना म्हणत आहे. 

इंद्रायणी मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा प्रोमो पाहून इरिनाला मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. इंद्रायणी मालिकेच्या या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १०० दिवसांच्या सीझनचा प्रवास ७० दिवसांतच संपणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आता वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर या सदस्यांमध्ये ट्रॉफीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारकलर्स मराठी