Join us

"निक्की तुझ्याशिवाय बिग बॉस...", घरात येताच अनिल थत्ते यांचं मोठं विधान, सदस्यांच्या भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:35 IST

राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या घरात येणार असल्याचे प्रोमो समोर आले आहेत. त्यांच्याबरोबरच पत्रकार आणि बिग बॉस मराठीचे एक्स स्पर्धक अनिल थत्ते बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेणार आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या सीझनमध्ये अनेक सरप्राइज चाहत्यांना मिळाले. होस्ट बदल्यापासून ते स्पर्धकांपर्यंत बिग बॉसने प्रेक्षकांना अनेक सुखद धक्के दिले. प्रेक्षकांबरोबरच बिग बॉस मराठीच्या घरात राहायला आलेल्या स्पर्धकांनाही बिग बॉसकडून अनेक धक्के मिळाले आहेत. या आठवड्यात सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटायला आले. आता बिग बॉस मराठीच्या घरातील काही माजी स्पर्धकांची घरात एन्ट्री होणार आहे. 

राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या घरात येणार असल्याचे प्रोमो समोर आले आहेत. त्यांच्याबरोबरच पत्रकार आणि बिग बॉस मराठीचे एक्स स्पर्धक अनिल थत्ते बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेणार आहेत. त्यांचा बिग बॉसच्या घरातील व्हिडिओ समोर आला आहे. बिग बॉसच्या घरात जाताच त्यांनी वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांच्याबद्दल केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

अनिल थत्ते वर्षा उसगावकर यांना म्हणतात, "वर्षा...ताई वगैरे मी म्हणणार नाहीये. माझी तरुपणाची ड्रीम गर्ल ही होती". त्यानंतर ते निक्कीचं कौतुक करताना दिसत आहेत. "निक्की तू वेगळी आहेस. तुझ्याशिवाय आम्ही बिग बॉसची कल्पना करू शकत नाही", असं ते म्हणत आहेत. अनिल थत्ते यांच्या या विधानानंतर मात्र घरातील इतर सदस्य आश्चर्यचकीत झाले आहेत. 

दरम्यान, पुढच्या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन संपणार आहे. ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता मिळणार आहे. आता घरात राहिलेल्या वर्षाताई, अभिजीत, पॅडी, अंकिता, सूरज, जान्हवी, निक्की, धनंजय या सदस्यांपैकी कोण 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी नावावर करणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार