Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 5: 'दुनियादारी' फेम अभिनेता दिसणार 'बिग बॉस'च्या घरात? 'त्या' पोस्टमुळे मिळाली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 16:16 IST

'बिग बॉस मराठी ५'बाबत एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमधून 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणाऱ्या स्पर्धकाबद्दल एक हिंट देण्यात आली आहे.

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाची चाहते गेली कित्येक दिवस आतुरतेने वाट पाहत आहेत. 'बिग बॉस मराठी ५'बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार? यासाठी चाहते आतुर आहेत. लवकरच 'बिग बॉस मराठी ५'ला सुरुवात होणार असून यामधील स्पर्धकांबाबत अंदाज वर्तविण्यात येत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये दुनियादारी फेम अभिनेता सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

कलर्स मराठीवरुन 'बिग बॉस मराठी ५'बाबत एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमधून 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणाऱ्या स्पर्धकाबद्दल एक हिंट देण्यात आली आहे. "दोस्तीच्या दुनियेतला यार, एक नंबर कलाकार! कोण आहे हा?" असं म्हणत ही पोस्ट केली गेली आहे. शिवाय दुनियादारी सिनेमातील "जिंदगी जिंदगी" हे गाणंही या पोस्टला देण्यात आलं आहे. त्यामुळे दुनियादारी सिनेमातील अभिनेता यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हा अभिनेता नेमका कोण आहे? याबाबत आाता सांगणं थोडं कठीण आहे. पण, चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत अंदाज बांधले आहेत. योगेश शिरसाट, प्रणव रावराणे, सिद्धार्थ खिरीद या अभिनेत्यांची नावं चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिली आहेत. योगेश शिरसाट आणि प्रणव रावराणे या अभिनेत्यांनी दुनियादारी सिनेमात काम केलं आहे. तर सिद्धार्थ फ्रेशर्समधून घराघरात पोहोचला. 

दरम्यान, 'बिग बॉस मराठी ५' येत्या २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाचा सीझन अभिनेता रितेश देशमुख होस्ट करताना दिसणार आहे. रितेशला 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता