Join us

शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 10:00 IST

अरबाज घरात येताच निक्कीकडे जातो आणि तिला उचलून थेट बेडरुममध्ये घेऊन जात असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. उद्या बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले होणार आहे. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. यापैकी कोण बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अशातच घरातील सदस्यांना बिग बॉसकडून मोठं सरप्राइज मिळणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वातील एक्स स्पर्धक घरातील सदस्यांना भेटण्यासाठी घरात येणार आहेत. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. आपल्याबरोबर घरात राहिलेल्या सदस्यांना पाहून स्पर्धकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तेवढ्यातच अरबाज धावत बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे. अरबाज घरात येताच निक्कीकडे जातो आणि तिला उचलून थेट बेडरुममध्ये घेऊन जात असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

अरबाज आणि निक्की बेडरुममध्ये बसल्याचं दिसत आहे. अरबाज निक्कीला म्हणतो, "तू मला म्हणत होती की तू जाताना रडला नाही". त्यावर निक्की म्हणते, "मला वाटलं तुझं बाहेर लफडं असेल. म्हणून तू माझ्यापासून तुटला आहेस". अरबाजच्या कोटवर बाई नावाचा ब्रॉचही लावल्याचं दिसत आहे. दरम्यान, ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार