Join us

Bigg Boss Marathi 4 : 'आज त्यांचे खरे रुप कळेल..', कोणाबद्दल बोलताहेत किरण माने आणि राखी सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 16:21 IST

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरत बीबी हायस्कूल भरणार असून काही सदस्य विद्यार्थीच्या भूमिकेत तर काही शिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरत BB High School भरणार असून काही सदस्य विद्यार्थीच्या भूमिकेत तर काही शिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच टास्कमध्ये आज अमृता धोंगडे आणि प्रसादमध्ये राडा होणार आहे. त्याचे कारण म्हणजे प्रसादने अमृताला नापास केले. 

अमृता म्हणाली, इथे समजते कोणाची बुद्धी किती आहे... .... थुकतील तुझ्यावर... आधी वाचायचं  बोलायचं. प्रसाद  म्हणाला,अंगावर येऊ नकोस... नॉन सेन्स नको वागूस. त्यावर अमृता प्रसादला बधिर म्हणाली... हा वाद अजून किती वाढला हे आजच्या भागामध्ये कळेल.

किरण माने, विकास आणि राखी चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये किरण म्हणाले, अमृता धोंगडे नक्कीच प्रसादला नापास करणार. राखी म्हणाली, तुम्हांला जे खतरनाक आहेत दोन... अक्षयला तुम्ही दुसरी संधी नाही देऊ शकणार... सारखा तो कॅप्टन नाही होणार आणि अपूर्वा. किरण म्हणाले, अक्षय - अपूर्वा टार्गेट वर ठेवायचे... विकास म्हणाला, मी एक करणार त्याने मुद्दा वाढणार. किरण आणि राखी म्हणाली, आज त्यांचे खरे रुप कळेल.बिग बॉस मराठी सोमवारी ते शुक्रवारी रात्री १० वाजता आणि शनिवारी- रविवारी रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर पाहायला मिळेल.

टॅग्स :बिग बॉस मराठीराखी सावंतकिरण मानेअमृता धोंगडे