Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये बोल्डनेसचा तडका, पहिल्या स्पर्धक जोडीचा व्हिडीओ समोर येताच भडकले फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 11:01 IST

Bigg Boss Marathi Season 4 : ‘बिग बॉस मराठी 4’च्या स्पर्धकांचा पहिला प्रोमो समोर येताच, शो ट्रोल होताना दिसत आहेत. अनेकांनी प्रोमोतील स्पर्धक जोडीचा बोल्ड डान्स पाहून संताप व्यक्त केला आहे.

छोट्या पडद्यावर एकाचवेळी दोन दोन ‘बिग बॉस’ पाहायला मिळणार आहेत. होय, एकीकडे हिंदी बिग बॉस रंगणार आहे तर दुसरीकडे मराठी बिग बॉस. तर सध्या बातमी आहे ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाबद्दल. होय, येत्या 2 ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी 4’ सुरू होतोय. सध्या या सीझनची चांगलीच चर्चा रंगलीये. ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये यंदा कोण कोण स्पर्धक पाहायला मिळणार, याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर आता पहिल्या स्पर्धक जोडीची एक झलक समोर आली आहे.

होय,  कलर्स मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. यात त्यांनी बिग बॉसच्या पहिल्या स्पर्धक जोडीची झलक पाहायला मिळतेय. प्रोमोत एक जोडी अतिशय बोल्ड डान्स करताना दिसत आहे. ‘मोहे रंग लगा दे रे’ या गाण्यावर दोघंही बेधुंद होऊन डान्स करत आहे. या स्पर्धकांचा चेहरा लपवण्यात आला आहे. नावही गुलदस्त्यात आहे.  चाहत्यांनी मात्र ही स्पर्धक जोडी कोण? याचा अंदाज बांधायला सुरूवात केली आहे. सोशल मीडियावरच्या अनेक युजर्सनी प्रोमोतील अभिनेत्री नेहा खान असल्याचा कयास व्यक्त केला आहे.

 

प्रोमो समोर येताच ‘बिग बॉस मराठी 4’ ट्रोल‘बिग बॉस मराठी 4’च्या स्पर्धकांचा पहिला प्रोमो समोर येताच, शो ट्रोल होतानाही दिसत आहेत. अनेकांनी प्रोमोतील स्पर्धक जोडीचा बोल्ड डान्स पाहून संताप व्यक्त केला आहे. हा काय फालतुपणा लावला आहे? मराठी बिग बॉस आहे, हॉलिवूड नाय. मराठी बिग बॉस लाज बाळगा, असं एका युजरने म्हटलं आहे. असली फालतुगिरी केली ना तर सीझन 101 टक्के फ्लॉ आहे, अशी संतप्त कमेंट एका युजरने केली आहे. असे घाणेरडे डान्स कृपया दाखवू नये. आम्ही सर्व सोबत टीव्ही बघतो. माझा 8 वर्षाचा मुलगा सुद्धा बघतो. तो हसत होता. मी काहीच बोलू शकली नाही. स्वामी समर्थ मालिकेच्या मध्ये ही घाणेरडी अ‍ॅड आली...कृपया भान ठेवा, अशी कमेंट एका चाहतीने केली आहे. मराठी गाणी संपली वाटतं, अशा शब्दांतही शो ट्रोल होत आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर कलर्स मराठीटेलिव्हिजनमराठी अभिनेता